रेतीघाट लिलावाच्या अनुषंगाने अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन - जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : जिल्ह्यातील सन 2025-26 या वर्षाकरीता वाळूगटांच्या राज्यस्तरीय (SEAC व SEIAA) पर्यावरण समितीची अनुमती मिळविण्याकरीता अर्ज सादर करावयाचे आहेत.
त्याकरीता जिल्ह्यातील वाळू गट निश्चित करण्यात आले असून उपलब्ध संसाधनाच्या आधारे जिल्हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाने 25 जुलै 2018 मध्ये प्रसिध्द केलेल्या वाळू / रेती उत्खनन मार्गदशक सूचनेनुसार सदर अहवाल जनतेच्या माहितीकरीता व अभिप्राय नोंदविण्याकरीता https://chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सदर अहवालातील रेती घाटांच्या लिलावाच्या अनुषंगाने आपले अभिप्राय उपरोक्त https://chanda.nic.in संकेतस्थळावर व miningofficer.chanda@gmail.com वर नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.
0 Comments