जन्मदाता वडिलांचा अवजड धारदार शस्त्राने वार करून मुलानेच केला खुन


 



जन्मदाता वडिलांचा अवजड धारदार शस्त्राने वार करून मुलानेच केला खुन Murder 

◾आरोपी चंद्रपुर शहर पोलीसांच्या जाळयात

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर शहरात  शेतीच्या वादावरून मुलाने दारूच्या नशेत जन्मदाता वडिलांचा अवजड धारदार शस्त्राने वार करून खुन केल्याची घटना काल सोमवारी रोजी दिनांक २३.०६.२०२५  रात्रो  चंद्रपुर शहर येथील बिनबा वार्ड येथे घटना घडलेली आहे.

सदर घटनेतील मृतक ताराचंद उर्फ दारासिंग बाबुसिंग बैस वय ६२ वर्षे याची वरोरा येथील मोवाडा येथे वडिलोपार्जीत शेती होती. सदर शेतीबाबत त्यांचा मुलगा आरोपी नामे मुन्ना उर्फ संग्रामसिंग ताराचंद उर्फ दारासिंग बैस वय ३० वर्षे हा नेहमी सदर शेतजमिनीबाबत घरात वाद करीत होता. दिनांक २३.०६.२०२५ चे २१.०० ते २३.०० वा. दरम्यान आरोपी मुन्ना हा घरी दारू पिवुन जुन्या शेतजमिनीच्या वादावरून वडीलांसोबत झगडा भांडण करू लागला. 

त्यानंतर आरोपीचा राग अनावर न झाल्याने त्यांने घरातील अवजड धारदार शस्त्र घेवुन वडीलांच्या तोंडावर, डोक्यावर आणि शरीरातील इतर भागावर वार करून जागीच जिवानिशी ठार केले. अशी माहिती मिळताच तात्काळ पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथील पोलीस पथक घटनास्थळी पोहचुन पंचनामा कार्यवाही करून पुरावे गोळा करून प्रेत सा. रूग्णालयात चंद्रपुर येथे रवाना करून आरोपीस घटनास्थळावरून ताब्यात घेतले. व पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे अप. क. ४३४/२०२५ कलम १०३ (१) भा. न्या. सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा पुढिल तपास मा. अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, मा. नओमी साटम, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात पोनि. निशिकांत रामटेके यांचे नेतृत्वात सपोनि. राजेंद्र सोनवने व पोस्टे चंद्रपुर शहर पथक करीत आहे.




Post a Comment

0 Comments