जनता हायस्कूल ( डेपो शाखा ) बल्लारपूर येथे शाळा व्यवस्थापन समिती सभा संपन्न
◾स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची जयंती साजरी
◾राज्यस्तरीय इन्स्पायर अवार्ड बाबत निवड झाल्याबद्दल कु. शिक्षा रामटेके हिचे करण्यात आले अभिनंदन
बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : जनता हायस्कूल ( डेपो शाखा ) बल्लारपूर या शाळेची शाळा व्यवस्थापन समिती सभा दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न झाली. सभेचे अध्यक्ष बी. बी. भगत मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक, यु. के. रांगणकर, मनीषा बोरीकर, वर्षा मांदाळे, प्रियंका रामटेके, आम्रपाली वेले यांची मंचावर उपस्थिती होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मागील सभेचे अहवाल वाचन आर. के. वानखेडे यांनी केले.
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आर. बी. अलाम यांनी स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या जीवनपटावर माहिती दिली तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेबाबत मार्गदर्शन केले.
सभाध्यक्ष च्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयात, जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शन 2023- 24 व 2024- 25 अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नवेगाव तालुका, जिल्हा: गडचिरोली येथे दिनांक: 17/ 11/ 2025 व 18 /11/ 2025 ला संपन्न झाले. त्या ठिकाणी शाळेची विद्यार्थिनी कु. शिक्षा चंदू रामटेके वर्ग 6 वा हिने गट 6 ते 8 मध्ये सत्र: 2024-25 साठी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तिच्या प्रतिकृतीचे नाव होते "दिव्यांगाकरिता बस" करिता मार्गदर्शक शिक्षक यु. के. रांगणकर सर या दोघांचा पुष्पगुच्छ देऊन सभेचे अध्यक्ष बी. बी. भगत यांचे हस्ते अभिनंदन करण्यात आले.
इन्स्पायर अवार्ड मिळाल्याबाबत मार्गदर्शन करताना यु. के. रांगणकर सर यांनी सांगितले की, "राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये दिव्यांगाकरीता सीट असते. पण बस मध्ये चढण्याकरीता त्यांना सोय नसते. त्यावर आधारित या प्रतिकृती मध्ये बसमध्ये दिव्यांगाकरीता लिफ्ट बसविण्यात आली आहे." याकरिता कु. शिक्षा रामटेके हिचे राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.
अध्यक्षीय भाषण करताना बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी सांगितले की, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घडवीण्यात पालकांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे.
सभेचे प्रास्ताविक आर. बी. अलाम व संचालन तसेच आभार प्रदर्शन एस. एन. लोधे मॅडम यांनी केले.
सभेत आर. के. वानखेडे, एस. एम. चव्हाण, गणेश चंदावार बाबू, जगदीश कांबळे, वामन बोबडे, वाल्मीक खोंडे, इंद्रभान अडबाले आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच विद्यार्थी वृंद उपस्थित होते. सभेच्या शेवटी विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आला.








0 Comments