अॅट्रॉसिटी प्रकरणात चंद्रपूर रामनगर पोलिस ठाण्यात दोन वकीलाच्या विरुद्ध एफआयआर दाखल
◾रामनगर पोलिस ठाण्यात 2 वकिलांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विनोद खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : कोर्ट रूम मध्ये तक्रारदाराला शिवीगाळ करणे, शांतता भंग करणे, धमकी देणे, अपमान करणे आणि जातीवाचक भाषा वापरणे या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात 2 वकिलांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विनोद खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विनोद खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, मुख्य आरोपी बादल उराडे, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, ग्रामसेवक लक्ष्मण शेंडे, ग्रामपंचायत लिपिक रेखा देरकर आणि ॲड. राजेश जुनारकर यांचे विरुद्ध पुलिसात तक्रार करूनही पोलिसांनी कार्रवाई ने केल्यामुळे बल्लारपूर न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल करण्यात आला. न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले.
बल्लारपूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. आरोपींनी त्यांच्या वकिलामार्फत या प्रकरणाविरुद्ध चंद्रपूर जिला न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि तक्रारदार खोब्रागडे यांनी सुध्दा चंद्रपूर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती.
मंगळवार १० जून २०२५ रोजी न्यायालयाच्या कक्षात यावरील सुनावणी होती. या सुनावणीसाठी तक्रारदार विनोद खोब्रागडे आणि साक्षीदार उपस्थित होते, दरम्यान दुपारी 3.35 वाजता एड. श्रीकांत कवटलवार आणि एका अज्ञात वकिलाने न्यायालयाच्या कक्षात अश्लील शिवीगाळ केली, शांतता भंग केली, धमकी दिली, अपमान केला आणि जातीवाचक शिवीगाळ केली. तक्रारदार खोब्रागडे यांनी तात्काळ पोलिस स्टेशन गाठले आणि आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर रामनगर पोलिसांनी आरोपी ॲड. कवटलवार आणि इतर 1 जणांविरुद्ध अॅट्रॉसिटी एक्ट दाखल केला आहे.
या प्रकरणात त्यांना जामीन मिळू नये म्हणून आक्षेप अर्ज दाखल करण्याची माहिती देण्यात आली. या प्रकरणात तक्रारदार विनोद खोब्रागडे आणि साक्षीदार बाबा उरकुडा रत्नपारखी यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची माहिती खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
0 Comments