Chandrapur चंद्रपूर शहरातील पटेल नगर येथील अतिक्रमणधारकांच्या खात्यात जमा होणार रक्कम - आमदार किशोर जोरगेवार
◾12 कुटुंबीयांच्या खात्यात प्रत्येकी 8 लाख 46 हजार रुपये जमा केले जाणार
◾आमदार किशोर जोरगेवार यांची महापालिकेत बैठक; पटेल नगरवासीयांनी मानले आ. जोरगेवार यांचे आभार
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : रेल्वेने पटेल नगर येथील अधिग्रहीत केलेल्या 15 कुटुंबीयांच्या खात्यात मंगळवार पर्यंत रक्कम जमा करण्याचे निर्देश मनपा अधिकाऱ्यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले असून, मंगळवारी यातील 12 कुटुंबीयांच्या खात्यात प्रत्येकी 8 लाख 46 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. यात अपात्र ठरलेल्या तीन कुटुंबांनाही सामावून घेण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी महानगर पालिकेत झालेल्या बैठकीत दिल्या आहेत.
या बैठकीला महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, माजी शहराध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, प्रकाश देवतळे, तुषार सोम, मनोज रॉय, माजी नगर सेवक देवानंद वाढई, प्रदीप किरमे,वंदना हातगावर यांच्यासह पटेल नगर येथील नागरिक उपस्थित होते.
2021 दरम्यान रेल्वेच्या तिसऱ्या लाईनसाठी बसस्थानक मागील पटेल नगर येथील नागरिकांची जागा रेल्वे प्रशासनाने अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. त्यानंतर सदर अतिक्रमणधारकांना मोबदला मिळवून देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रयत्न केले. दरम्यान 2023 मध्ये रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या मोजणी करून जागेचे मूल्यांकन केले होते. त्यानंतर प्रत्येकी घराला 8 लाख 46 हजार रुपये या प्रमाणे एकूण 1 कोटी 26 लाख 90 हजार रुपये फेब्रुवारी 2025 मध्ये रेल्वे विभागाने चंद्रपूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित केले. मात्र, सदर पैसे अतिक्रमणधारकांना मिळाले नाहीत.
त्यामुळे आमदार किशोर जोरगेवार यांनी आज महसूल आणि मनपा अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन सर्व प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून येत्या मंगळवार पर्यंत अतिक्रमणधारकांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी सर्व अतिक्रमणधारकांकडून 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर स्वयघोषणापत्र लिहून देण्याचे सांगण्यात आले असून, दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी दिल्या आहेत.
पावसाळा संपेपर्यंत घरे काढू नका - सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे अतिक्रमणधारकांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर लगेचच त्यांची घरे हटवू नका. नवीन घर शोधण्यासाठी सर्व अतिक्रमणधारकांना चार महिन्यांची मुदत द्या. पावसाळ्यात कोणाचेही घर खाली करू नका, असे स्पष्ट निर्देश या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सुभाष कासनगोट्टूवार यांचा सातत्यपुर्ण पाठपूरावा
सदर अतिक्रमण धारकांना मदत मिळवून देण्यासाठी भाजप नेते तथा माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपूरा केला होता. जागा मुल्यांकन करण्यासाठीही त्यांचे विशेष प्रयत्न राहिले आहे. आजच्या बैठकीतही सुभाष कासनगोट्टूवार यांनी पटेल नगर वासीयांची ठामपणे बाजू मांडली.







0 Comments