अल्ट्राटेक ( मानीकगड ) सिमेंट प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
◾शेतकऱ्याचे धुळीमुळे नुकसान
◾गावामध्ये किडनी, हार्ड अटॅक, शुगर, बीपी व लहान मुलांना आजाराने ग्रासले
कोरपना ( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर स्थित गावालगत असलेल्या माणिकगड अल्ट्राटेक युनिटसिमेंट प्लांटमध्ये लगत असलेल्या थुट्रा गोपालपूर गडचांदूरयेथील 30 ते 35 शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक नष्ट होत असून शेतीमध्ये काम करण्याकरिता मजूर देखील धुळीमुळे उपलब्ध होत नाही सातत्याने पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे आशीर्वाद असल्याने यापूर्वी कंपनीवर अनामत रक्कम जप्तीची देखील कार्यवाही करण्यात आली मात्र या सिमेंट उद्योगाला कोणताच परिणाम झाला नसून अविरत रात्रच्या अंधारात धुळीचे कण वायू प्रदूषण मुळे गोपालपूर या गावातील पाणीपुरवठा योजना निवड नष्ट मुळे बंद पडली असून गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सातत्याने सौर ऊर्जेच्या प्लेटवर धूळ बसत असल्याने सौर यंत्र सुरळीतपणेचालत नाही यामुळे गावातील उन्हाळ्यामध्ये नागरिकांना घराबाहेर झोपले देखील कठीण झाले आहे गावात घराच्या छतावर व अंगणामध्ये जोडीचे धुकेसतत पडत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
गावामध्ये किडनी, हार्ड अटॅक, शुगर, बीपी व लहान मुलांना आजाराने ग्रासलेले आहे.
शेतामध्ये रब्बी असो की खरीप संपूर्ण पिके धुळीमुळे नष्ट होत असून जमिनीची सुपीकता झपाट्याने नष्ट झाली असून शेतीमध्ये चार ते आठ इंच धुळीच्या मातीचे थर जमा झाल्याने शेतीमध्ये नांगरणी व कास्त करणे देखील शेतकऱ्यांना कठीण झाले आहे.
याबाबत यापूर्वी कोरपणा येतील तहसीलदार प्रदूषण नियंत्रण मंडळ व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे गोपालपूर येथील नागरिकांनी जमिनीची तपासणी व मौका चौकशी करण्याचीमागणी केली होती परंतु एक महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा कृषी विभाग किंवा महसूल विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळांनी कोणतीही चौकशी केलेली नाही.
यामुळे शेतकऱ्याबद्दल प्रशासन किती गंभीर आहे , याचा अनुभव या गावातील आपतग्रस्त नागरिकांना आलेला आहे शासनाने माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रदूषणामुळे होत असलेल्या परिणामाची तातडीने चौकशी करून न्याय देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
यापूर्वी झरी तालुक्यातील आरसीपीपी एल सिमेंट कंपनी मुकुटबन व कोरपणा तालुक्यातील अंबुजा सिमेंट कंपनीने प्रति एकरी 15000 तर आरसीपीपी एल यांनी हेक्टरी 54 हजार दोनशे रुपये शेतकऱ्यांना दिलेले आहे.
एकीकडे प्रशासन यवतमाळ जिल्ह्यात जागाहून शेतकऱ्याप्रती सहानुभूतीने प्रयत्न करून लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करतो तर दुसरीकडे मात्र या भागात धुळीमुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट झाली असताना व आदिवासींचे खुलेआम शोषण होत असताना इथे प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेऊन न्याय देण्यासाठी तोंडाला पाणे पुसत असल्याचे चित्र आहे.
यामुळे आदिवासी शेतकऱ्या मध्ये असंतोष वाढत असून अन्याया विरोधात लढा उभारूण न्यायलयाचे दार ठोठाविण्याचे संकेत दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गावात प्रदूषण विरोधात वातावरण तापले असून सुरेश आत्राम, अनिल मडावी, मारोती मेश्राम, बिरशाव कोरांगे, वामन कोडापे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आदिवासी कुटूंबावर होणारा अन्याय परिणाम हा प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या माध्यमातून दुर्लक्षामुळे होत असल्याने शेती उत्पादणासह आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व सचिव यांना पाठविलेल्या निवेदनातून केल्याची माहिती राष्ट्रवादी कॉग्रेस चे प्रदेश सहसचिव आबीद अली यांनी दिली.
0 Comments