एच.एस.सी. बोर्ड परीक्षा 2025 निकाल जाहीर कला विभागाचा निकाल 87.50%,वाणिज्य विभागाचा निकाल 76.92%
◾मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर.
◾कला विभागातून एकूण 24 विद्यार्थिनी परीक्षेसाठी बसल्या होत्या त्यात एकूण 21 विद्यार्थिनी पास
◾विज्ञान विभागातून 50 विद्यार्थिनी बसल्या होत्या त्यात 47 विद्यार्थिनी पास
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात बारावीच्या बल्लारपूर सेवा समिती बल्लारपूर द्वारा संचालित मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथील विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादित केले.
यात कला विभागातून एकूण 24 विद्यार्थिनी परीक्षेसाठी बसल्या होत्या त्यात एकूण 21 विद्यार्थिनी पास झाले असून कला विभागाचा निकाल 87.50% लागला. त्यात प्रथम क्रमांक लजिना खान (73.17%), द्वितीय राणी वर्मा (70.83) क्रमांक हिने पटकाविला. तर वाणिज्य विभागाचा निकाल 76.92% लागला. त्यात वाणिज्य विभागातून 39 विद्यार्थिनी परीक्षेस बसल्या होत्या त्यात 30 विद्यार्थिनी पास झाल्या, त्यात प्रथम क्रमांक निशा वर्मा (61.50),द्वितीय क्रमांक संजना दास (55.83), व विज्ञान विभागाचा निकाल 94 % लागला.
त्यात विज्ञान विभागातून 50 विद्यार्थिनी बसल्या होत्या त्यात 47 विद्यार्थिनी पास झाल्या. त्यात प्रथम क्रमांक मौर्वी सदाला ( 78% ), द्वितीय क्रमांक ईशा मिश्रा ( 75.50 ) यांनी पटकाविला. या यशाबद्दल बल्लारपूर सेवा समिती बल्लारपूर चे संस्थापक श्री.जैनुद्दीन जव्हेरी सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. तसेच शाळेच्या प्राचार्या असमा खान खलीदी मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षिका वृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा दिल्या.
0 Comments