चंद्रपूर जिल्ह्यात इ.एस.आय.सी रुग्णालय सुरु करा - मनसे कामगार सेना ची मागणी
◾मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांची जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आरोग्य मंत्री प्रकाश आंबीटकर यांच्याकडे मागणी.
चंद्रपूर( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातं असतांना व लाखों कामगार या उद्योगात कार्यरत असतांना कामगारांना योग्य व तात्काळ आरोग्य सुविधा जिल्ह्यात मिळत नाही, त्यामुळे उपाचाराअभावी कित्तेकांचा जीव जातो म्हणून आपल्या चंद्रपूर मध्ये एक इ.एस.आय.सी रुग्णालय सुरु करा अशी मागणी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत विभाग जिल्हाध्यक्ष रमेश कालबांधे, सुनील गुढे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
जिल्ह्याच्या कंपन्या मध्ये ज्या दुर्घटना घडतात व कामगारांना गंभीर जखमा झाल्यास चंद्रपूरच्या मेडिकल कॉलेज मध्ये कामगारांना भरती करून नंतर खाजगी रुग्णालयात नेतात व नंतर नागपूरला हलवले जाते त्या दरम्यान बहुतांश कामगारांचा मृत्यू होतो, परंतु जर चंद्रपूर जिल्ह्यात इ.एस.आय.सी रुग्णालय जर खोलण्यात आले तर कामगारांचे नुकसान होणार नाही व वेळेवर उपचार करण्यात आला तर कांमागारांचे जीव वाचतील त्यामुळं कामगारांच्या हक्काचे रुग्णालय हे चंद्रपूर जिल्ह्यात इ.एस.आय.सी रुग्णालय स्थापन करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले.
0 Comments