कॅम्पुटर इन्स्टिट्यूट मध्ये अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा प्रयत्न

 






कॅम्पुटर इन्स्टिट्यूट मध्ये अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा प्रयत्न

 ◾संगणक संचालका विरुद्ध बल्लारपूर पोलिस स्थानकात पॉस्को एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील स्थानिक महाराणा प्रताप वॉर्डातील कॉम्प्युटर अकादमी इन्स्टिटयूट 16 वर्षीय विद्यार्थिनी 30 ऑगस्टला सकाळच्या सुमारास असता त्यातील ऑपरेटरने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. 

या घटनेची वाच्यता त्या मुलीने शेजारी राहणाऱ्या काकूला सांगितली व ही बाब मुलीच्या कुटुंबियांना माहीती झाली असता पीडित मुलीचं कुटुंबीय आपल्याला जाब विचारायला येणार असं लक्षात येताच संगणक संस्था बंद करून पसार होण्याच्या स्थितीत असता काही नागरिकांनी त्या ऑपरेटरला चोप दिला. 

विशेष म्हणजे सदर कॉम्प्युटर संस्थेचा संचालक हें प्रतिष्ठित राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असून घडलेल्या प्रकारात तडजोड करण्यासाठी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्नही केला मात्र पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांनी खंबीर भूमिका घेतली.

 1 सप्टेंबरला सदर कॉम्युटर इन्स्टिटयूट सुरु झाले असता नागरिकांनी संगणक संचालकाला चोप दिला या घटनेची माहीती बल्लारपूर पोलिसांना कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाली. सोबतच पीडित मुलगी व तिचे कुटुंबीय पोलिस स्थानकात दाखल झाली संपूर्ण प्रकारची माहिती पोलिसांना दिली असता या माहितीच्या आधारावर बल्लारपूर पोलिसांनी काल रात्री उशिरा या प्रकरणातील संगणक संचालक संजय वाजपेयी यांचे विरुद्ध 354, 354(l),(i) व पॉस्को ऍक्ट 12 व 8 अंतर्गत गुन्हा दाखल अटक कऱण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास बल्लारपूर पोलिस करीत आहे.




Post a Comment

0 Comments