चंद्रपूर, नागपूर रोडवर डी फाम व बीएसडब्ल्यू या विद्यार्थ्यांसाठी बस थांबवण्यात यावी.






चंद्रपूर, नागपूर रोडवर डी फाम व बीएसडब्ल्यू या  विद्यार्थ्यांसाठी बस थांबवण्यात यावी. 

 ◾शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने विभागीय कार्यालय, चंद्रपूर यांना निवेदन

◾बस स्टॉप पासून कॉलेज १/२ कीलो मीटर वर

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : आज दिनांक 2/9/2022 ला चंद्रपूर आगार येथे पडोली नागपूर रोडवर डी. फाम व बीएसडब्ल्यू हे कॉलेज असून तिथे शिकत असणाऱ्या विद्यार्थ्याना बस थांबा असून सुद्धा बस थांबत नाही काल सुशीलाबाई रामचंद्र मामीडवार बीएसडब्ल्यू येथे शिकत असलेल्या विद्यार्थिनीला बस चालकाने उद्धटपणे बोलून बसच्या खाली उतरविले आणि ही बस पडोलीला जात नाही असे सांगून तिच्या सोबतच्या विद्यार्थ्यांना त्याच कॉलेजमधल्या घेऊन गेले. त्याकरिता बस चालकाची तक्रार करण्यात आली. असून पडोली समोर नागपूर रोडवर डी फाम व बीएसडब्ल्यू या खास विद्यार्थ्यांसाठी बस थांबवण्यात यावी.          कारण त्या स्टॉप पासून कॉलेज १/२ कीलो. मीटर वर आत मध्ये पायी प्रवास विद्यार्थ्यांना करावा लागतो. त्या करीता तीथे बस थांबा द्यावा. 

असे निवेदन अभियांत्रिक यांना देण्यात आले. कारण शिकत असणारे विद्यार्थी सगळेच शहरातले नसून ग्रामीण भागातले बरेच विद्यार्थी आहे. त्यांच्यासाठी एकमेव एसटी महामंडळ ही सेवा योग्य आहे एसटी महामंडळाने त्वरित दखल न घेतल्यास शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने पुढील शिवसेना पद्धतीने कारवाई करण्यात येईल असे निवेदन देण्यासाठी शिवसेना महिला आघाडी चा विद्या ठाकरे, कुसुम उदार प्रतिभा तेलतुंबडे, भावना पाटील, विजय ठाकरे,  महादेव पाटील, धर्मपाल कांबळे अन्य शिवसैनिक उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments