बाप्पांच्या आगमनानंतर चंद्रपूर शहर मनपा येथे दीड दिवसांच्या १५०४ श्रीगणेश मुर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन
◾विसर्जित मुर्तींमधे एकही पीओपी मुर्ती नाही
झोन क्र. १(अ ) अंतर्गत ३२२, झोन क्र. १(ब ) अंतर्गत ११६, झोन क्रमांक २ (अ ) अंतर्गत - ४०२, झोन क्रमांक २ (ब ) - २३०, झोन क्र. ३(अ) - २१९, झोन क्रमांक ३ (ब ) येथे - २१५ अश्या दीड दिवसाच्या एकुण १५०४ श्रीगणेश मुर्तींचे विसर्जन शहरात झाले. यात पीओपी मुर्ती एकही आढळुन आली नाही. याप्रसंगी कृत्रीम कुंडात विसर्जन करून पर्यावरणास हातभार लावल्याबद्दल गणेशभक्तांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. शहरात दीड दिवसाचा, पाच दिवसाचा तसेच दहा दिवसाच्या गणपतींचे विसर्जन केले जाते. घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच अथवा जवळच्या कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी मनपा प्रयत्नशील आहे. याकरीता २३ कृत्रिम तलाव व २० निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली आहे.
कृत्रिम विसर्जन स्थळांमध्ये झोन क्र. १ (कार्यालय) - २, साईबाबा मंदीर - १, दाताळा रोड,इरई नदी - २, तुकुम प्रा.शाळा (मनपा,चंद्रपूर) - २, नटराज टॉकीज (ताडोबा रोड) - २, गांधी चौक - १,शिवाजी चौक - २, रामाळा तलाव - ४,लोकमान्य टिळक प्रा.शाळा पठाणपुरा रोड - १, विठोबा खिडकी विठ्ठल मंदीर वॉर्ड - १, महाकाली प्रा. शाळा - १, सावित्रीबाई फुले प्रा. शाळा बाबुपेठ - २ , झोन क्र. ३ (कार्यालय) - २ असे एकुण २३ कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. या व्यवस्थेमध्ये भर घालत चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मूर्ती संकलनासाठी ' फिरते विसर्जन कुंड ' कार्यरत ठेवण्यात आले आहे.






.jpeg)
.jpeg)

0 Comments