धक्कादायक ! चंद्रपूर जिल्ह्यातील वरोऱ्यात बापाने आपल्या दोन चिमुकल्याना विष पाजून हत्या केल्याची घटना

 






धक्कादायक ! चंद्रपूर जिल्ह्यातील वरोऱ्यात बापाने आपल्या दोन चिमुकल्याना विष पाजून हत्या केल्याची घटना 

वरोरा ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्ह्यातील कुष्ठरोगाचे आश्रयस्थान म्हणुन ओळखलं जाणार शहर वरोरा असून या शहरातील बोर्डा परिसरात एक धक्कादायक घडली आहे. 

या परिसरात एका बापाने आपल्या चिमुकल्या मुलाला व मुलीला विष पाजून हत्या केल्याची घटना घडली आहे.

 या विषयी विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहीती नुसार बोर्डा गावातील वास्तव्यास असलेले संजय श्रीराम कांबळे हें शिकवणी वर्ग घेण्याचे काम करीत होता तसेच पत्नी सुध्दा एका महाविद्यालयात कंत्राटी तत्वावर काम करीत होत्या मात्र या कुटुंबाला वडिलाचीच नजर लागली की काय? दोन्ही मुलांना सुमित संजय कांबळे वय-7 वर्षे व मिश्री संजय कांबळे वय-3 वर्षे या दोघांनाही विष पाजून हत्या केली आणि पसार झाला आई महाविद्यालयातून घरी येऊन पाहता दोन्ही मूल घरी बेशुद्धावस्थेत दिसता आईने आरडाओरडा सुरु केला लगेच दोन्ही मुलांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यत मुलाचा जिव गेला होता. 

प्राथमिक अंदाजानुसार मुलांना विष पाजून व गळा आवळून हत्या केल्याचा अंदाज वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे या विषयी वरोरा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला असून पोलिस त्या निर्दयी बापाचा कसून शोध घेत आहे.




Post a Comment

0 Comments