रेल्वेच्या अपघातात वेकोलि ( WCL) कामगाराचा मृत्यू
◾पूर पाहायला रेल्वेमार्गाने जाणे पडले महाग
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : मागील काही दिवसापूर्वी पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्याना पूर आला पूर परिस्थिती निर्माण झाली कि मानवी स्वभावात कुतूहल निर्माण होऊन पूर पाहायची आवड निर्माण होते मात्र हीच पूर पाहण्याची आवड एखाद्याच्या जीवावर बेतेल असं कुणालाही वाटलं नव्हतं.
वेकोलि च्या सास्ती खुल्या खाणीत कार्यरत असलेले कर्मचारी विसापूर लगतच्या रेल्वे मार्गाने पूर पाहायला गेले मात्र दिल्ली-चेन्नई मार्गावर पोल क्र. 886/20 ते 886/22 दरम्यान मागून येणाऱ्या रल्वेने सदर व्यक्तीला जबर धडक दिली या अपघातात त्यांचा मृत्यू झाला याविषयीच्या अधिक माहितीनुसार आज शुक्रवार ला सायंकाळी 4:30 वाजताच्या दरम्यान विसापूर जुन्या रेल्वे फाटकाजवळ चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर सदर अपघात घडला असून या अपघातात रविंद्र बापूराव उलेमाले, वय ( 48 ) वर्षे, रा. विसापूर ता. बल्लारपूर असे मृत्यू झालेल्या वेकोलि कर्मचाऱ्याचे नाव आहे.
विशेष म्हणजे वर्धा नदीला पूर आल्यामुळे मागील 3 ते 4 दिवसापासून ते घरीच होते विसापूर गावात पूर आल्यामुळं ते पूर पाहण्यासाठी रेल्वे पुलाकडे जात असतांना व विचार चक्रात गुंतले असतांना विसापूर लगतच्या जुन्या रेल्वे फाटकाजवळ मागून रेल्वे येत असल्याचे काहींनी सांगितले असतांना सुध्दा मात्र काही कळायच्या आत मागून येणाऱ्या रेल्वेने त्यांना जबर धडक दिली व या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील व मोठा आप्त परिवार आहे. या घटनेची माहीती होताच विसापूर बिटचे पोलिस कर्मचारी गजानन साखरकर व दुष्यन्त गोडबोले घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा केला या घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलिस करीत आहे.






0 Comments