रंगारी समाजा तर्फे भुजिलीया महोत्सव साजरा



रंगारी समाजा तर्फे भुजिलीया महोत्सव साजरा 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील रंगारी समाजा तर्फे भुजिलीया महोत्सव साजरा करण्यात आला.भूजलिया या महोत्सव हे मागील 75 हून अधिक वर्षापासून राखी या सणाच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात येते.या महोत्सवात बल्लारपूर या मुख्य शहरांमध्ये रॅली चा आयोजन करण्यात येतो, रॅली ही बल्लारपूर येथील गांधी वार्डा मधून रॅलीच्या आयोजन करण्यात आले रॅली शहराच्या मुख्य मार्गाने निघून वर्धा नदी गणपती घाट येथे रॅलीचे समापन करण्यात आले. 

रॅली मध्ये रंगारी समाजाच्या महिला गौर घेऊन रॅली मध्ये सहभागी होते. रॅलीचे समापन करून मुख्य कार्यक्रमास सुरावत करण्यात आली मुख्य कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून समाजातील जेष्ठ महिला श्रीमती. पार्वताबाई शेटीये,श्रीमती. पार्वताबाई बिलगये, श्रीमती. शोभाबाई बिलारीये,श्रीमती. हिराबाई शेटीये, श्रीमती. पचोरिया जी अध्यक्ष श्री. राजू चुरे आणि सचिव श्री. प्रकाश बिलारीये हे होते . मुख्य कार्यक्रमाची सुरवात माता शारदा  यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले.  उत्सवा मध्ये सर्व प्रथम गुणवंत विद्यार्थिचा सत्कार व नव दाम्पत्याचा सत्कार करून समाजातील वयोवृद्ध व्यक्तिच सत्कार केला गेला.  शेवटी अध्यक्षीय भाषण झाले.मुख्य कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. बाबुसिंग बिलारीये व कु श्रद्धा बिलारीये यांनी केले आणि आभार प्रदर्शन सौं. प्रीती वैद्य यांनी केले . भुजलीया उत्सवास यशस्वी रित्या पूर्ण करण्या करिता भुजालिया उत्सव समितीने अथांग परिश्रम गाठून उत्सवास यशस्वी रित्या पूर्ण केले.प्रामुख्याने श्री. बाबुसिंग बिलारीये, श्री. प्रशांत बडघरे, श्री मनोज किसान, श्री. गजानन बडघरे,श्री. राजू पचोरिया,श्री. कवडू शेटीये,श्री. अनिल वैद्य,श्री. प्रकाश बिलोरिया, श्री. विशाल बिलोरिया, श्री. संदीप वैद्य, श्री. संदीप बिलोरिया, श्री. श्री. सागर चुरे,श्री. शुभम पचोरिया,श्री. प्रदीप बिलोरिया,श्री. अनुप शेटीये, श्री. विकास रक्षिये,श्री. शुभम शेटीये,श्री. राहुल सिसोदीया आणि सर्व सदस्य गण  यांनी उत्सवास पाळण्याकरिता अथांग परिश्रम केले.



Post a Comment

0 Comments