घुग्घूस वरून वणीकडे जाणाऱ्या ट्रकने एकास चिरडल्याने ; एकाचा मृत्यू

 


घुग्घूस वरून वणीकडे जाणाऱ्या ट्रकने एकास चिरडल्याने ;  एकाचा मृत्यू

◾मृतदेह सोबत चक्काजाम

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर )  : घुग्घूस बस स्टॉप येथे दूचाकीने तिघे जाताना सुभाष नगर पार्क जवळ दुचाकी स्लिप होऊन तिघेही खाली कोसळले. 

घुग्घूस येतुन वणीकडे जाणाऱ्या वाहनाने एकास चिरडल्याची घटना शनिवारी घुग्घूस येथे घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी राजीव रतन चौकात मृतदेह सोबत घेवून रात्री साडेसातच्या सुमारास चक्काजाम करण्यात आला. फिर्यादी पेतरस रमेश चिलकावार ( 22 ) वर्ष रा . शास्त्रीनगर घुग्घूस.  यांनी पोलीस स्टेशन येथे बयान दिली त्याच्या बयानावरून आज दुपारी 2 वाजता दरम्यान अरबाज शेख ( 21 ) वर्ष, विनय बरे ( 17 ) वर्ष व पेतरस चिलकावार ( 22 ) वर्ष असे तिघे शास्त्रीनगर येथून दुचाकीने अरबाज शेख याला बस स्टॉपवर सोडण्याकरीता जात असताना सुभाष नगर पार्क जवळ दुचाकी स्लिप होऊन तिघेही खाली कोसळले त्याचवेळेस राजीव रतन चौकाकडून येणाऱ्या MH 27 C 407 ट्रकने धडक दिल्याने अरबाज शेख याच्या पोटाला गंभीर जखमी तर विनय याच्या हाताला मार लागला.

अरबाज शेख याला ताबडतोब उपचारासाठी हलविले परंतु त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रात्री साडेसातच्या सुमारास संतप्त नागरिकांनी मृतदेह रस्त्यावर आणून राजीव रतन चौकात चक्काजाम केला. तपास घुग्घुस पोलिस करत आहे. शहरात उडाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. 



Post a Comment

0 Comments