हर घर तिरंगा अभियान अंतर्गत निवासस्थानी तिरंगा फडकवून हंसराज अहीर यांचेव्दारा

 






हर घर तिरंगा अभियान अंतर्गत निवासस्थानी तिरंगा फडकवून  हंसराज अहीर यांचेव्दारा

◾युवक व ज्येष्ठ नागरिकांना तिरंगा ध्वजाचे वितरण


     

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या अमृत महोत्सवी स्वातंत्रयाच्या राष्ट्रव्यापी ‘‘हर घर तिरंगा’’ अभियान अंतर्गत पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री  हंसराज अहीर यांनी दि. 13 ऑगस्ट रोजी चंद्रपूर महानगरातील विविध परिसरात जावून नागरीकांना भारतीय तिरंगा ध्वजाचे वितरण करुन घरावर हा ध्वज फडकविण्याचे आवाहन केले. 


दि. 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत राबविल्या जाणाऱ्या  या अभियानाच्या अनुषंगाने हंसराज अहीर यांनी सहकाऱ्यांसह  निवासस्थानी तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. चंद्रपूर महानगरातील अल्पसंख्यांक बांधवांसोबत हर घर तिरंगा अभियानात सहभागी होवून तिरंग्याचे वितरण केले. भद्रावती, घोडपेठ, माजरी येथील भाजप  पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह हे अभियान राबवित घरोघरी तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले. या अभियान प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते अफजलभाई यांच्या निवासस्थानी भेट देवून तिरंगा घ्वज देत अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

या मोहिमेंअंतर्गत हंसराज अहीर यांनी महानगरातील विविध ठिकाणी स्वतः उपस्थित राहून तिरंग्याचे युवक व ज्येष्ठ नागरीकांना वितरण केले. या अभियानात चंद्रपूर महानगरातील अल्पसंख्यक बांधवांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेत आपल्या घरावर तिरंगा फडकविला. तिरंगा ध्वजाचा सन्मान करीत प्रत्येक नागरिकांनी आपल्या निवासस्थानी तिरंगा ध्वज फडकवून केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा अभियानास सफल करावे असे आवाहन या प्रसंगी हंसराज अहीर यांनी केले. या अभियानामध्ये हंसराज अहीर यांचेसमवेत विनोद शेरकी, अफजलभाई, सुनिल नामोजवार, इम्रान खान, हिमायू अली, पूनम तिवारी, नकुल आचार्य, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments