राज्य सरकारचे नवी नियमावली : राज्यभरात नाईट कर्फ्युची घोषणा, १० जानेवारी मध्यरात्री पासून अमलबजावणी
मुंबई ( राज्य रिपोर्टर ) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा डोकेवर काढलेल्या कोरोनाचा सामना करण्यासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आलीये. यात स्विमिंग पूल, स्पा आणि जीम पुन्हा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय पुन्हा एकदा नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत ही अंमलबजावणी करण्यात येईल. याशिवाय सकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत जमाव बंदीचे धारा १४४ आदेश लागू करण्यात येणार आहेत. या काळाच पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरण्यावर निर्बंध असतील. १० जानेवारी मध्यरात्रीपासून ही नवी नियमावली लागू होईल. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे दिसते. नव्या नियमांचे कठोर पालन करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळ पूर्णपणे बंद राहतील. सरकारी कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकी घ्याव्या अशा सुचना करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेनं सुरु राहतील. ज्यांनी दोन डोस घेतले आहेत त्यांनाच कार्यालयात येऊन काम करता येईल. प्रवासादरम्यानही कोरोना नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना प्रतिबंधित लशीचे दोन डोस घेतले असतील तरच तुम्हाला प्रवासाची मूभा दिली जाईल.
रेस्टोरंट, हॉटेल, खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. क्रीडा क्षेत्रात नियोजित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात कोणताही व्यत्यय नसेल. पण संपूर्ण स्पर्धाही प्रेक्षकांशिवाय पार पाडावी लागेल. शाळा आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. लग्न कार्यक्रमात ५० टक्के लोकांनाच परवानगी असेल.


0 Comments