धक्कादायक घटना : कुऱ्हाडीने हल्ला करून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना
गोंडपीपरी ( राज्य रिपोर्टर ) : शनिवारी रात्री अंदाजे ९:०० वाजताच्या दरम्यान पत्नीला कुऱ्हाडीने मारून जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील भंगाराम तळोधित घडली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून मिळाली आहे. याविषयी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पती पत्नीत रात्री वाद झाला वादानंतर पतिने पत्नीला विद्युत शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केला नंतर कुऱ्हाडीने वार करून जागीच ठार केले.घटनेनंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला आरोपी राजू बावणे वय अंदाजे ४२ वर्ष, याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उपचारासाठी गोंडपीपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मृतक योगिता राजू बावणे वय-३५ यांचे प्रेत उत्तरीय तपासणी साठी पाठवले असून ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.अध्यापही हत्येचे कारण कडले नाही.पुढील तपास ठाणेदार राजगुरू यांच्या मार्गर्शनात सुरू आहे.


0 Comments