कोरोना काळात मृत्यू पावलेल्याना मदतनिधी साठी आप्तस्वकीयांनी अर्ज करण्याचे आवाहन - मा.संजय राईचंवार, तहसीलदार बल्लारपूर

 



कोरोना काळात मृत्यू पावलेल्याना मदतनिधी साठी आप्तस्वकीयांनी अर्ज करण्याचे आवाहन - मा.संजय राईचंवार, तहसीलदार बल्लारपूर

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : मार्च २०१९ पासून जगभरात धुमाकूळ घालत असलेला कोरोना विषाणूजन्य आजारामुळे बल्लारपूर तालुक्यात ११० व्यक्तींचा मृत्यू झाला आहे विशेष बाब म्हणजे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना ५० हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात येणार आहे यासाठी संबंधित तहसील कार्यालय वा प्रशासकीय अधिकाऱ्याकडे ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. सद्यस्थितीत बल्लारपूर तालुक्यात ४९ मृत व्यक्तींच्या वारसांनी कोविड मदतनिधी साठी ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून उर्वरित ६१ नागरिकांपैकी ३५ लोकांशी संपर्क झाला तर २६ लोकांशी अद्यापही संपर्क झालेला नसून जर कोविड मुळे मृत पावलेल्याच्या वारसांना आपल्यापैकी कुणी ओळखत असाल तर त्यांना तहसील कार्यालय बल्लारपूर येथे संपर्क साधण्यास सांगावे असे आवाहन मा.संजय राईचंवार तहसीलदार बल्लारपूर यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments