ओव्हरटेक करणे पडले चांगलेच महाग : कोरची जवळ काळी-पिवळीच्या धडकेत रस्ता अपघातात दोघांचा मृत्यू



ओव्हरटेक करणे पडले चांगलेच महाग : कोरची जवळ काळी-पिवळीच्या धडकेत रस्ता अपघातात दोघांचा मृत्यू 

( राज्य रिपोर्टर )  वृत्तसेवा : एका ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील दोन युवकांना समोरून येणाऱ्या काळीपिवळी जीपची जबर धडक बसली. यात दोघांनाही जागेवरच प्राण गमवावे लागले. हा अपघात कोरचीपासून सहा किलोमीटरवर असलेल्या बोडेना गावसमोरील वळणावर शुक्रवारच्या दुपारी झाला. प्राप्त माहितीनुसार, कुरखेडा ते कोरची-देवरी या मार्गावर नियमित प्रवासी घेऊन चालणारी काळी-पिवळी जीप शुक्रवारी सकाळी ११ वाजता देवरीवरून प्रवासी घेऊन कोरचीकडे येण्यासाठी निघाली होती. मसेली, बोडेना गावाजवळील वळणावर दुपारचे १ वाजताच्या सुमारास विरुद्ध दिशेने ट्रक येत होता. दरम्यान त्या ट्रकच्या मागे असलेल्या दुचाकी वाहनावरील दोन युवकांनी ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी काळीपिवळी वाहनाची दुचाकीला (एमएच ३६, आर ३२८३) जबर धडक बसली. त्यात नीलकुमार रावजी आचले (२३ वर्षे) आणि प्रकाश बुधराम हिडामी (३१ वर्षे), दोघेही रा. फुलगोंदी हे रस्त्यालगत फेकल्या जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच कोरची पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक समाधान फडोड, हवालदार रामलाल हिडामी, पोलीस शिपाई विष्णू उरकुडे घटनास्थळी दाखल झाले.


Post a Comment

0 Comments