पोलिसांच्या गाडीला ट्रकने उडविले, अनेक पोलीस जखमी

 



पोलिसांच्या गाडीला ट्रकने उडविले, अनेक पोलीस जखमी 

 ◾चंद्रपुरात एमईएल जवळ रस्ता अपघात 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्हा मुख्यालयात असलेल्या कामासाठी ब्रम्हपुरी येथील काही पोलीस आपल्या शासकीय वाहनाने चंद्रपुरात येत असताना सायंकाळच्या सुमारास चंद्रपूर शहरातील एमईएल जवळ चंद्रपूर कडून मूल ला जात असलेल्या ट्रक ने जोरदार धडक दिल्याचे वृत्त आहे सदर अपघात घडल्यानंतर ट्रक चालक आपले वाहन घटनास्थळी सोडून पसार झाला मात्र या अपघातात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताची माहिती कळताच रामनगर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले व जखमींना मदत तर केली शिवाय वाहतूक सुरळीत केली. चंद्रपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या पोलीस बांधवांची आस्थेने विचारपूस केली मात्र सदर अपघात नेमका कशा मुळे झाला याबाबत अनेक तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहे.


Post a Comment

0 Comments