सफाई कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर मिळवीले तिन स्टार आता त्यांच्या कामगीरी करिता त्यांना द्या दहा हजार
◾यंग चांदा ब्रिगेडची मागणी उद्या गुरुवारी मनपा समोर ५ स्टार आंदोलन
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : सफाई कर्मचा-याच्या भरवश्यावर मिळविलेल्या तिन स्टारचा गवगवा करत स्वताची प्रसिद्धी करणा-या मनपातील भ्रष्टाचा-र्यांनी सफाई कर्मचा-याचे प्रश्न अद्यापही सोडविले नाहीत. अपूरे संसाधन असतांना सुध्दा शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करत असलेल्या सफाई कर्मचा-र्यांना त्यांच्या कामगीरी करिता प्रत्येकी दहा हजार रुपये जाहिर करावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच मनपातील भ्रष्टाचारी सत्ताधा-यांविरोधात ५ स्टार प्रदान पूरस्कार सोहळा हे अभिनव आंदोलन उद्या गुरुवारी दुपारी 1 वाजता करण्यात येणार असल्याचेही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जाहिर करण्यात आले आहे. हा पूरस्कार स्विकारण्यासाठी स्वतः महापौर, उपमहापौर आणि स्थायी समीती सभापती यांनी उपस्थित राहावे असे आवाहणही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.
अत्यल्प कमी वेतन आणि अपू-या संसाधनातही मनपातील चंद्रपूरचा भुमिपुत्र असलेला सफाई कर्मचारी आपली उत्तम सेवा देत असून चंद्रपूर शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करत आहे. असे असतांनाही त्यांच्या अनेक मागण्या मनपातील भष्ट्राचारी सत्ताधा-र्यांनी प्रलंबीत ठेवल्या आहे. परिणामी येथील सफाई कर्मचाऱ्यांना या विरोधात अनेकदा आंदोलनही करावे लागले आहे. दरम्याण याच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या श्रमामूळे मनपाला स्वच्छता सर्वेक्षणात तिन स्टार देण्यात आले आहे. याचे श्रेय स्वत: घेण्यासाठी मनपाच्या पदाधिका-र्यांनी शहरात मोठ मोठी होल्र्डींग लावले आहे. मात्र या होल्र्डींगवर खर्च करण्यापेक्षा हेच पैसे या पूरस्काराचे खरे मानकरी असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या खात्यात टाकायला हवे होते असेही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने म्हणण्यात आले आहे.
मनपातील भष्ट्राचा-र्यांनी मागील चार वर्षात अमृत कलश योजना घोटाळा, घनकचरा घोटाळा, कोविड घोटाळा, आझाद बाग घोटाळा, लेखापरिक्षणात कोट्यावधी रुपयांची अनियमितता यासह अनेक घोटाळे करणा-या मनपातील भ्रष्ट पदाधिका-र्यांना पाच स्टार नामांकन देण्याकरीता उदया गुरुवारी यंग चांदा बिग्रेडच्या वतीने दुपारी एक वाजता मनपा समोर पूरस्कार प्रदान सोहळा या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामूळे जनतेच्या पैशाचा दूरुउपयोग करणा-या मनपातील भ्रष्टाचा-र्यांना 5 स्टार देण्यासाठी नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, शहर संघटक कलाकार मल्लारप, पंकज गुप्ता यांच्या वतीने करण्यात आले आहे.


0 Comments