मुख्य कार्यकारी अधिकारी जळगांव डॉ. पंकज आशिया कारवाई करतील काय?
जळगाव, रावेर, दीपक तायडे, ( राज्य रिपोर्टर ) : रावेर येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. D.H सोनवणे हे त्यांच्या कडे आलेल्या तक्रारींची वर्षानुवर्षे चौकशी च करीत नसल्याचे दिसून येत असल्याने पुराव्यानिशी केलेल्या तक्रारींची चौकशी न करणाऱ्या या अधिकाऱ्यावर दप्तर दिरंगाई अधिनियम 2005 नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार कोसोदेयांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे दिनांक 21/12/21 रोजी केलेली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, वाघोदा खु येथे कार्यरत असलेले तत्कालीन ग्रामसेवक श्री. शिवाजी सोनवणे यांनी 14 व्या वित्त आयोगाच्या पाच वर्षांच्या प्राप्त अनुदानातून केलेल्या कामावर मजूरच लावलेले नाही तसेच या ग्रामसेवकाने तब्बल12वर्ष स्वतः ची एन्जोप्लास्टी झालेली असतांना हृदय शस्त्रक्रियाझाल्याचे भासवून बदली टाकलेली होती , यावर्षी तक्रार झाल्याने वाघोदा खु येथून श्री. सोनवणे यांनी काढता पाय घेतला तसेच श्री. राहुल लोखंडे रेभोंटा येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असताना बदली झाल्यावर देखिल 5/6 वर्षे अनधिकृत पणे ग्रामपंचायत चे दप्तर स्वतः जवळ ठेवण्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे तसेच श्री. राहुल लोखंडे यांनी बनावट अपंग प्रमाणपत्र सादर करून वेळोवेळी बदलीचा लाभ ही पदरात पाडून घेतल्याचे उघड झाले आहे. या दोघांविषयी पंचायत समिती स्तरावर वर्षे भरापासून मोठ्या प्रमाणात तक्रारी होऊनही विस्तार अधिकारी श्री. सोनवणे त्यांना पाठीशी घालत आहेत त्यामुळे वर्षभरात कुठलीही चौकशी न करणाऱ्या या अधिकाऱ्यावर संतोष कोसोदे यांनी कारवाई करण्याची मागणीडॉ पंकज आशिया ceo जळगांव यांचे कडे केलेली आहे.


0 Comments