चंद्रपूर- बल्लारपूर मार्गावरील रस्त्यालगतचे झुडपी जंगल साफ करा

चंद्रपूर- बल्लारपूर मार्गावरील रस्त्यालगतचे झुडपी जंगल साफ करा 

 ◾रात्री बेरात्री प्रवास करणाऱ्यांना  हिंस्त्र प्राण्यांचा धोका वाढल्याने केली मागणी - राजू झोडे

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर ते चंद्रपूर मार्गावर दररोज कामावर ये-जा करणारे कामगार व नोकरदार यांना रात्री-बेरात्री या मार्गावरून प्रवास करावा लागतो. सदर महामार्ग हा झुडपी जंगलाने व्यापलेला असून रस्त्यालगतच मोठे झुडपी जंगल तयार झाले आहे. काल परवाच एका अधिकाऱ्याचा हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यामुळे जिव गमवावा लागला. या घटनेमुळे प्रवास करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तरी रस्त्याला लागून असलेल्या झुडपी  जंगलालगतचा आजूबाजूचा परिसर किमान पंचवीस मीटरपर्यंत स्वच्छ करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजु झोडे यांनी केली.

     बल्लारपूर चंद्रपूर महामार्गावर पेपर मिल, डब्ल्यूसीएल येथील कर्मचारी व कामगार तसेच इतर प्रवासी रात्री बेरात्री या मार्गाने प्रवास करत असतात. या महामार्गालगत झुडपी जंगल असल्यामुळे हिस्त्र प्राण्यांचा वावर वाढलेला आहे. हिंस्त्र प्राण्यांचा कधीही हल्ला होऊ शकतो व असा प्रकार बरेचदा येथून ये-जा करणाऱ्या सोबत घडलेला आहे. काल परवाच एका पोलिस अधिकाऱ्याला आपला जीव बिबट्याच्या हल्ल्यामुळे गमवावा लागला. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण झालेले असून संबंधित प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन महामार्ग लगतचे झुडपी जंगल स्वच्छ करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात आली.

       जर वरील मागणी पूर्ण झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन झुडपी जंगल स्वतः स्वच्छ करेल व संपूर्ण कचरा संबंधित प्रशासनाच्या कार्यालयामध्ये आणून टाकण्यात येईल असा इशारा प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते राजु झोडे, संपत कोरडे, सचिन पावडे, नवीन डेविड, स्नेहल साखरे तथा अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments