जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर रेल्वे स्थानक गेटसमोर चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने जननायक बिरसा मुंडा चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असून, त्याचा भूमिपूजन सोहळा गुरुवार, दिनांक 16 डिसेंबर रोजी माजी अर्थमंत्री, लोकलेखा समितीचे अध्यक्ष, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यकरण करण्यासाठी आदिवासी समाजबांधवांसह नगरसेविकानी मागणी केली होती. त्यानुसार रेल्वेस्थानक गेटसमोर शासकीय जागेवर सौंदर्यीकरण करण्यासाठी मनपाने मंजुरी प्रदान केली. या उद्या गुरुवारी भूमिपूजन सोहळा होणार असून, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


0 Comments