18 चाकी ट्रकची ट्रॅक्टरला जोरदार धडक; भीषण अपघात दोन जण जागीच ठार एक जण गंभीर जखमी

 


18 चाकी ट्रकची ट्रॅक्टरला जोरदार धडक; भीषण अपघात दोन जण  जागीच ठार एक जण गंभीर जखमी

घुग्घुस ( राज्य रिपोर्टर ) :  वेकोलि वनी परिसरातील घुग्घुस खदान संकुलात बांधण्यात आलेल्या नवीन बायपास रोडवर  MH 34  5080 या ट्रॅक्टरला 18 चाकी ट्रक क्रमांक MH 34 AB 9362  ने जोरदार धडक दिली या धडकेत ट्रॅक्टर चालक मनोज, हेल्पर रुपेश बारसागडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य एक गंभीर जखमी आहे.

जखमींना उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ घडले पुढील तपास पोलीस करीत आहेत. घटनास्थळी काँग्रेस नेता राजु रेड्डी, रोशन पाचारे, पवन आगदारी, सैय्यद अंवर वा भाजप नेते विवेक बोढे घटनास्थळी दाखल झाले. मृतकाला  50 लाख दिल्याशिवाय उचलू देणार नाही अशी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाले आहे घटनास्थळी पोलिसांच्या चौका बंदोबस्त आहे.

Post a Comment

0 Comments