मेणबत्ती मार्च काढून वाहिली श्रद्धांजली, एनसीसी म्हणाले- आम्ही आमचा नायक गमावला.
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : 21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्धा च्या स्थानिक एनसीसी यूनिट महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय व गुरुनानक विज्ञान महाविद्यालय बल्लारपूर च्या संयुक्त विद्यमाने एनसीसी च्या 152 छात्र सैनिकां द्वारे संध्याकाळी शहरातील मुख्य मार्गाने बचत भवन, नवीन बस स्टॉप, रेल्वे चौक, जुना बस स्टॉप आणि नगर परिषद चौक मार्गे मेणबत्ती व शांती मार्च काढण्यात आला.
नगर परिषद समोर पोलीस निरीक्षक उमेश पाटील बल्लारपूर पोलीस यांच्या हस्ते पुष्पचक्र चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांच्या प्रतिमेला अर्पण करण्यात आला. त्याच प्रमाणे त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि तामिळनाडूच्या कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व 11 महान योद्धांच्या आदरांजली देत निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पोलीस अधिकारी गायकवाड, एनसीसी अधिकारी डॉ.महेशचंद शर्मा गुरुनानक महाविद्यालय, एनसीसी अधिकारी प्रा. योगेश टेकाडे, डॉ. पंकज कावरे, डॉ बालमुकुंद कायरकर, प्रा. पंकज नंदुकर, प्रा. कृष्णा लाभे, पोलिस कर्मचारी आणि एनसीसी कॅडेट्स यांनी मेणबत्ती पेटवून आणि पुष्पहार अर्पण करून आत्म्याच्या शांतीसाठी दोन मिनिटे मौन पाळले.
तत्पूर्वी सकाळी गुरुनानक विज्ञान महाविद्यालयात आणि महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात, एनसीसी विभागा द्वारे आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात दोन्हीं महाविद्यालयाचे माननीय प्राचार्यां अनुक्रमे डॉ बहिरवार आणि प्रा. कल्याणी पटवर्धन च्या द्वारे पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली देण्यात आली. त्यावेळेस सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि एनसीसी कॅडेट्स व विद्यार्थीनी दोन मिनिटे मौन पाळून श्रध्दांजली वाहिली.


0 Comments