पू.भदंत कृपाशरण महास्थविर यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने दुःखद निधन
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : अखिल भारतीय भिक्षु संघ महाराष्ट्र राज्य चे संघटक पु. भदन्त कृपाशरण महास्थविर रा.तक्षशिला बुध्द विहार, विकास नगर बाबूपेठ चंद्रपूर यांचे आज सायंकाळी ६:४० मिनिटांनी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने उपचारादरम्यान निधन झाले याविषयीच्या अधिक माहिती नुसार पु.भदंत महास्थविर यांना गुरुवार ला रात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा धक्का आला त्यांना त्वरित चंद्रपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू असतांना आज ११ डिसेंम्बर २०२१ ला आज सायंकाळी ६:४० मिनिटांनी दुःखद निधन झाले त्यांचेवर अंतिम यात्रा उद्या १२/१२/२०२१ ला दुपारी २:०० वाजताच्या दरम्यान तक्षशिला बुध्द विहार, विकास नगर बाबूपेठ चंद्रपूर येथून बायपास मार्ग-विसापूर-बल्लारपूर- बामणी मार्ग प्रज्ञा घाट राजुरा येथे सायंकाळी ४:०० वाजताच्या दरम्यान भिक्षु संघ व उपासक-उपासिकांच्या उपस्थितीत करण्यात येईल.


0 Comments