चंद्रपुर जिल्ह्यात आठवडी बाजार सुरु करण्याचा आदेश निर्गमित

 


चंद्रपुर जिल्ह्यात आठवडी बाजार सुरु करण्याचा आदेश निर्गमित

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याचे फलित

 चंद्रपुर  ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपुर जिल्ह्यात आठवडी बाजार सुरु करण्याचा आदेश  जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी दि. 1 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित केला आहे. विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.

राज्‍यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढल्‍यानंतर लागु करण्‍यात आलेल्‍या लॉकडाउन पासुन आठवडी बाजार बंद करण्‍यात आले होते.  टप्‍याटप्‍याने अनलॉक सुरू झाल्‍यानंतर अद्याप आठवडी बाजार मात्र सुरू करण्‍यात आले नसल्याने आठवडी बाजारावर ज्‍यांचा उदरनिर्वाह‍ अवलंबुन आहे अशा छोटया – मोठया व्‍यावसायीकांचा व्‍यवसाय बंद होता व त्यामुळे त्‍यांच्‍यावर उपासमारीची पाळी आली . ही बाब लक्षात घेता त्‍वरीत आठवडी बाजार सुरू करावे अशी मागणी  आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासन व जिल्हा प्रशासनाकडे केली व त्याचा प्रभावी पाठपुरावा केला. नुकतीच त्यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेवून ही मागणी रेटली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्वरीत याबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. जिल्हाधिका-यांनी 3 ते 4 दिवसात आठवडी बाजार सुरु करण्याचे आश्वासन आ. मुनगंटीवार यांना दिले होते. सदर आश्वासनाची पूर्तता झाली आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आठवडी बाजारावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांची मोठी समस्या दूर झाली आहे.







Post a Comment

0 Comments