न.प बल्लारपुर च्या विविध विभागातील कर्मचार्यांच्या सेवानिवृती निमित्य नगराध्यक्ष मा.हरीशजी शर्मा यांच्या हस्ते सत्कार
नगर पालिकेच्या माध्यमातून इतके वर्ष आपण जनतेची सेवा केली मात्र आता आपल्या परिवाराला वेळ देत आनंदित रहा - हरीश शर्मा नगराध्यक्ष
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : नगरपरिषदेच्या विविध विभागातील कर्मचारी श्री.एकनाथ ठाकरे,श्री.सुनिल तुमराम,श्री.देविदास पोयाम,जनाब.जलील बेग मिर्झा,ह्या चार कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात नगराध्यक्ष मा.हरीशजी शर्मा यांनी संबोधित करतांना म्हणाले की, नगरपालिकेच्या माध्यमातून इतके वर्ष आपण जनतेची सेवा केली मात्र आता आपल्या परिवाराला वेळ देत आनंदित रहा पुढील आयुष्याच्या वाटचालीत आपणास व आपल्या परिवाराला सुख-समृद्धी लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना व मनोभावे शुभेच्छा!
तसेच यावेळी नगर परिषद चे उप.मुख्याधिकारी श्री.अभिजीत मोटघरे यांचे वरोरा नगर परिषदेत स्थानांतरण ( बदली ) झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आले व भावी वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी शिक्षण सभापती सौ.सारिका कमकम, उप मुख्याधिकारी श्री.जयवंत काटकर सर हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन कार्यालय अधीक्षक श्रीमती संगीता उमरे यांनी केले.











0 Comments