जेष्ठ नागरिकांचा अनुभव समाजाच्या उन्नतीसाठी उपयोगी - आ. किशोर जोरगेवार

 


जेष्ठ नागरिकांचा अनुभव समाजाच्या उन्नतीसाठी उपयोगी - आ. किशोर जोरगेवार

🔸जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहासाठी २५ लक्ष रुपयाची घोषणाजेष्ठ नागरिक संघाचा कार्यक्रम संपन्न


    चंद्रपुर (राज्य रिपोर्टर )जेष्ठ नागरिकांकडे अनुभवाचा अमुल्य साठा आहे. त्यांचा  हाच अनूभव समाजाच्या सर्वांगीक विकासासाठी उपयोगी असून त्यांच्या या अनुभवाचा समाजाने समाजाच्या हितासाठी उपयोग करुन घेतला पाहिजे .असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. तसेच जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहासाठी २५ लक्ष रुपये देणार असल्याची घोषणाही यावेळी आ. जोरगेवार यांनी केली.
            जेष्ठ नागरिक दिनानिमीत्य आज शुक्रवारी जेष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात जेष्ठ नागरिक ओळखपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेवराव पिंपळकरश्रीराम तोडासेडाॅ. बंडूदास डाभेरेगोसाई बलकीमारोतराव मत्तेगंगाधर पिदूरकरमानिकराव गहूकरअरविंद मुछूलवाररमेश येगीनवाररामटेकेगूरकरराजू तंगडपल्लीवारगणेश बहेकरआदिंची  प्रमूख उपस्थिती होती.

          यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले किज्येष्ठांचा सन्मान व त्यांच्याप्रती आपल्या मनात असलेला आदर व्यक्त करण्यासाठी तसेच ज्येष्ठ लोकांशी जगात होणारे गैरवर्तन आणि अन्यायाला रोखण्यासाठी जेष्ठ नागरिक दिवस पाळल्या जातो. हा दिवस साजरा करत असतांना समाजात जेष्ठ नागरिकांची आजची स्थिती याबाबत चिंतन झाले पाहिजे. जेष्ठ नागरिक संघाची जेष्ठांना जेवढी गरज आहे. तेवढीच या संघाची गरज समाजालाही आहे. त्यामूळे समाजानेही जेष्ठांचा त्यांच्या विचारांचा आदर केला पाहिजे. त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. मला मुंबईच्या सर्वोच्च सभागृहात प्रचंड बहुमताने पाठविण्यात ज्येष्ठांची भुमीका महत्वाची होती. त्यामूळे आज मला वाटपाचा अधिकार मिळाला असता तो योग्य ठिकाणी वाटप करण्याचा मि प्रयत्न करत असून ज्येष्ठ नागरिक संघाच्या अडचणी सोडविण्याला प्राधाण्य देत असल्याचे ते यावेळी म्हणाले,  रामनगर येथील जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहासाठी मी २५ लक्ष रुपये देणार आहे. सोबतच नगीनाबाग येथील जेष्ठ नागरिक संघासाच्या सभागृहासाठी २५ लक्षमुल रोडवरील विश्रांती वरिष्ठ नागरिक सेवा संघाच्या सामाजीक सभागृहासाठी २५ लक्ष रुपये आणि सरकार नगर येथील ज्येष्ठ नागरिक मंडळासाठी २५ लक्ष रुपये आपण देत असल्याचे ते यावेळी म्हणाले. नौकरीतून सेवानिवृत्त झाले असलात तरी समाजाची सेवा करण्याच्या जबाबदारीतून कधिही निवृत्त होऊ नका समाजाला तूमच्या मार्गदर्शनाची गरज असून तूमचा हा संघ विचार आणि अनुभवाच्या ठेवीचे केंद्र आहे याचा फायदा समाजाला होऊ दया असेही ते यावेळी बोलतांना म्हणाले. या कार्यक्रमात ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र वाटप करण्यात आले.






Post a Comment

0 Comments