चंद्रपूर-बल्लारपूर महामार्गावर अपघातग्रस्ताला वेळीच मदत मिळाल्याने वाचले प्राण
🔹1,29,930/- रोख रक्कम जखमींची जीव वाचविणाऱ्या 4 व्यक्तींनी प्रामाणिक पणाने परत केली रोख रक्कम
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर-बल्लारपूर महामार्गावर काल रात्री १२:०० ते १२:१५ च्या सुमारास अमोल यशवंत वट्टे वय ३८ वर्ष रा.कन्नमवार वार्ड बल्लारपूर यांचा स्वतःचे बजाज पल्सर वाहन चालवीत असतांना महामार्गावर अपघात घडला त्यावेळी मार्गावर काळोख असतांना रात्री १२:०० वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन बल्लारपूर ला अपघाताची माहिती कळताच पोलीस उपनिरीक्षक अनिल चांदोरे व पोशी विलास खरात यांचे सह तात्काळ चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर असलेल्या निर्मल ढाबा या घटनास्थळी पोहोचले व लगेच रुग्णवाहिका सुध्दा पोहोचली असता अपघातग्रस्त अमोल हा रस्ता दुभाजकालगत बसून होता.
विशेष बाब म्हणजे अपघातप्रसंगी देवदूतासारखे धावून आलेले व त्याची मदत करणारे १) नितीश कडुकर, रा.गोकुळ नगर वार्ड बल्लारपूर, २) धनपालसिंग वधावन रा.राजुरा,३) अक्षय आसटकर, ४) राधे कविश्वर या चौघांच्या मदतीने अपघातग्रस्ताला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भर्ती केले या दरम्यान घटनास्थळी एक बॅग सापडली असता ती बॅग पोलिसांनी तपासली असता त्यात रोख रक्कम आढळून आली असता सदर रोख रक्कम वरील चारही व्यक्ती व अपघातग्रस्ताच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत योग्य ती कारवाई करून 1,29,930/- रोख रक्कम जखमींची बहीण सुषमा वट्टे यांच्या स्वाधीन करण्यात आली आहे विशेष बाब म्हणजे देवदूतासारख्या आलेल्या या चारही व्यक्तींनी अपघातग्रस्ताची वेळेवर तर मदत केलीच शिवाय प्रमाणिकपणाचा परिचय देऊन रोख रक्कम ही परत केली त्यांच्या या कृतीचा बल्लारपूर पोलिसांनी तर सन्मान केलाच शिवाय बल्लारपूर कर ही या कार्याबद्दल त्या चौंघाचे अभिनंदन करीत आहे. ही सर्व कारवाई माननीय पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिल चांदोरे व पोशी विलास खरात यांनी केली आहे.









0 Comments