धक्कादायक : अमरावती जिल्ह्यात वर्धा नदीत नाव उलटून ११ व्यक्ती बुडाले ३ मृतदेह मिळाले : शोधमोहीम सुरू
अमरावती ( राज्य रिपोर्टर ) : आज सकाळी १० वाजता दरम्यान अमरावती जिल्ह्यात मन हेलवणारी घटना घडली असून बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत झुंज येथे घडली आहे. एक कुटुंब दशक्रियेचा कार्यक्रम आटोपून वर्धा नदीपात्रात आज सकाळी १० वाजता दरम्यान नावेने जात असताना अचानक नाव उलटली आणि ११ जण वर्धा नदीपात्रात बुडाले आहेत. यापैकी तिघांचा मृतदेह गावकऱ्यांकडून शोधण्यात आला आहे. तर सद्या बेनोडा पोलीस घटनास्थळी दाखल झालीय. रेस्क्यू टीम पथक देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आलंय. सद्या झुंज येथे वर्धा नदी पात्राजवळ परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केलीय. सद्या वरुड मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. उर्वरित बुडालेल्या व्यक्तीची शोध मोहीम सद्या युध्द पातळीवर सुरू असून या घटनेत बहीण, भाऊ व जावई सुध्दा बुडाल्या ची माहिती असून शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत नावाडी, एक महिला व चिमुकलीचा मृतदेह मिळाला असून इतर व्यक्तीचा शोध सुरू आहे.









0 Comments