तळा महाविद्यालय व अंनिसच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त भागात श्रमदान व मदत वाटप

 

तळा महाविद्यालय व अंनिसच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त भागात श्रमदान व मदत वाटप

तळा, रायगड ( राज्य रिपोर्टर) : कला व वाणिज्य महाविद्यालय तळा व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने महाड येथील पूरग्रस्त भागात नुकतेच  श्रमदान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे तळा येथील द. ग. तटकरे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. नानासाहेब यादव, डॉ. भगवान लोखंडे, डॉ. थोरात, डॉ. एन. एस. गायकवाड, डॉ. दत्ता कुंटेवाड, डॉ. कदम प्राध्यापकेतर कर्मचारी मंगेश पोळेकर, किशोर मोरे व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रायगड जिल्हा शाखेतील पनवेल, म्हसळा, माणगाव व तळा येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नवेनगर व पंचशील नगर या भागातील नागरिकांना कपडे मेडिकल किट व अन्नधान्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र अंनिस पदाधिकारी सौ.आरती नाईक, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष विजयकुमार सोनवणे, रायगड जिल्हा कार्यवाह महेंद्र नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments