दोन ठिकाणी अवैधरित्या हातभटटी मोहादारू तयार करणाऱ्या विरुद्ध कारवाई

 






दोन ठिकाणी अवैधरित्या हातभट्टी मोहादारू तयार करणाऱ्या विरुद्ध कारवाई

◾पोलीस स्टेशन चिमुर हद्दीत मौजा मालेवाडा व पिपर्डा अश्या दोन ठिकाणी अवैधरित्या हातभट्टी मोहादारू तयार करणाऱ्या विरुद्ध कारवाई

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक 13/ 11/2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारावर चिमूर पोलिसांनी पोलीस स्टेशन चिमुर हद्दीत मौजा मालेवाडा व पिपर्डा अश्या दोन ठिकाणी अवैध रित्या हातभट्टी मोहादारू बाबत प्रोव्ही रेड केली असता.

१) १५ मोठे प्लास्टीक ड्रम मध्ये ७५० किलो मोहासडवा किंमत १,८७,५०० रू २) ६ प्लास्टीक कॅन मध्ये ६० लिटर मोहादारू किंमत १८,००० रू व इतर साहीत्य ७,००० रू अशा एकुण २,१२,५००/- रू चा माल अवैधरित्या मिळुन आल्याने घटनास्थळावर नाश करण्यात आला तसेच अवैदयरित्या सट्टा पट्टी जुगारवर कार्यवाही करून सदर आरोपी विरुध्द पो. स्टे. चिमुर येथे दारुबंदी व जुगार कलमान्वये गुन्हा केला असून  सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक करीत आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी चिमूर  दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  दिनेश लबडे यांच्या नेतृत्वाखाली पोहवा. सचिन साठे, पोअं. सचिन खामनकर, पो.अं. रुपेश शामकुळे, सौरभ महाजन यांनी केली आहे.




Post a Comment

0 Comments