आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते शहरातील विविध ठिकाणच्या १२ विकास कामांचे भुमिपूजन
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : शहरातील विविध विकास कामांसाठी स्थानिक विकास निधी व खनिज विकास निधीतून आमदार किशोर जोरगेवार यांनी मोठा निधी मंजूर केला असून या निधीतून लालपेठ, इंदिरा नगर आणि पागलबाबा नगर येथील १२ विकास कामे केल्या जाणार आहे. आज या कामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक कलाकार मल्लारप, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, राजेश वर्मा, संजीव बहूरीया, अशोक अहूजा, बंडु तोटावार, वेकंटेश सुरा, सुदामा यादव, क्रिष्णा यादव, प्रतिक रामटेके, अमन खान, मनोज मत्ते, वेनू कोडेन, चंद्रकांत पाटील, रुपेश मुलकावार, नरेश आत्राम, संदिपपान मुन, नितेश बोरकूटे, सतिश सोनटक्के, निखील शेंडे, कल्पना पाटील, सुनंदा मून, लक्ष्मन पूरेड्डीवार, मदन माडूरवार, क्रिष्ण स्वामी, अच्यूतन नायर, शिंघरी यादव, मधूकर मोहितकर, निताई कुंन्डू, सूभाष सोनी, किशोर रामशेट्टीवार आदिंची उपस्थिती होती.
विधानसभा क्षेत्रातील शहरी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असून या भागाच्या विकास कामांसाठी त्यांच्या वतीने स्थानिक विकास निधी व खनिज विकास निधीतून मोठा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून इंदिरा नगर येथील सिमेंट काँक्रिटचे तिन रोड, पागलबाबा नगर येथील सिमेंट काँक्रीट रोडसह इतर ८ विकास कामे तसेच लालपेठ येथील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. या सर्व विकास कामांचे आज शुक्रवारी आ. किशोर जोरेगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन संपन्न झाले. या भुमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले कि, शहराचा काही भाग अद्यापही विकासाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामूळे आजवर दूर्लक्षीत राहिलेल्या प्रभागांच्या विकासाला आपण प्राथमीकता देत असून येथील नागरिकांच्या मागणीनूसार ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. या भागातील १२ कामे मंजूर करुन येथील नागरिकांची जूनी व महत्वाची मागणी मला सोडविता आली याचे समाधान आहे. दुर्लक्षीत प्रभागातील विकास कामे जलदगतीने पूर्ण झाली पाहिजे यावर आपला भर असून येत्या काळात येथील इतरही महत्वाची कामे पुर्ण करण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करुन देण्याचे माझे प्रयत्न राहणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
या भुमिपुजन सोहळ्याला यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते पंकज गुप्ता, विलास वनकर, अमोल शेंडे, विलास सोमलवार, राशिद हुसेन, प्रतिक शिवणकर, राम जंगम, रुपेश कुंदोजवार, गौरव जोरगेवार, विश्वजीत शाहा, नितीन शाहा, तापूश डे, नितेश गवळी, दिनेश इंगळे यांच्यासह इतर कार्यकर्त्याची व स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 Comments