चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय कोविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर व मिनी व्हेंटिलेटर उपलब्ध द्यावे
🔸हंसराज अहीर यांची केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरी यांच्याकडे मागणी
चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) : चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका स्तरावरील अनेक उपजिल्हा रुग्णालयांना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर ऑक्सिजन ची आवश्यकता असलेल्या रुग्णांचे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर अभावामुळे बेहाल होतांना दिसले असता तातडीने ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर उपलब्ध करून देऊ असे वैद्यकिय अधिकाऱ्यांना अहीर यांनी सांगितले.
अहीर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांची भेट घेऊन ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर व मिनी व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या बाबत मागणीचा सहानुभूतीने विचार करून शक्य तेवढ्या लवकर ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर व मिनी व्हेंटिलेटर उपलब्ध करण्याचे मा नितीन गडकरी यांनी आश्वासन दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका स्तरावरील उपजिल्हा रुग्णालय वरोरा, भद्रावती, राजुरा, गडचांदुर, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, शेगाव व माढेळी येथे तसेच यवतमाळ जिह्यातील पांढरकवडा उपजिल्हा रूग्णालय, वणी, मारेगांव, झरी जामनी, घाटंजी व आर्णी येथे आॅक्सीजन काॅन्स्ट्रेटर तातडीने पुरविण्याची व्यवस्था करावी अशी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरी यांना मागणी केली.




0 Comments