चोपडा उप जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट ची यशस्वी चाचणी पूर्ण...!

 

चोपडा उप जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट ची यशस्वी चाचणी पूर्ण...! 

जळगाव/चोपडा(राज्य रिपोर्टर) : चोपडा तालुक्यातील जनतेचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत.आपल्या साऱ्यांचे सहभागाने घेतलेला ऑक्सिजन प्लांट ची चाचणी यशस्वी झाली असून प्रती दिवस १,२५,००० लिटर ऑक्सिजन पूर्ण दाबाने मिळत आहे.त्यामुळे दिवसभर २१सिलिंडर ची बचत होणार आहे. आज पर्यंत त्यासाठी जनतेने ₹१०,६६,३३९/- जमा असून अजून काही रक्कम देणे बाकी आहे. निश्चित पने  आपल्या आशीर्वादाने ती देखील जमा होईल यात शंका नाही.

प्रार्थमिक आरोग्य केंद्राच्या ऑक्सिजन पाईप लाईन साठी चोपडा तालुक्यातील सुपुत्र श्री. जयंत दादा पाटील  यांचे कडून जाहीर झालेले ₹ १,५०,०००/- चा धनादेश त्यांची बहीण  सौ. जयश्री चव्हाण व मेहुणे डॉ. प्रवीण चव्हाण ,सौ. शैलाताई  पाटील यांनी दिला तर दुसरे दानशूर रतनलाल सी बाफना ट्रस्ट कडून जाहीर झालेले ₹१,००,०००/- चे धनादेश देखील प्राप्त झाले असून काम करणाऱ्या पुणे येथील Global energy management services ह्या एजन्सी ना advance दिला गेला. त्या दोघांचे धन्यवाद.

   बांधवांनो,तिसऱ्या लाटेची वर्तवलेली शक्यता लक्षात घेता ऑक्सिजन बेड  मिळण्याची शक्यता धूसर असल्याने व लहान मुलांसोबत त्यांचे आई /वडील कसे राहू शकतील हा प्रश्न सतावत असल्याने ,आपण चोपडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किमान दहा ऑक्सिजन बेड करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत वरील अडीच लाख रुपये आहेत.त्यासोबत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भागातील नागरिकांनी काही निधी गोळा केला तर सारे केंद्र हे सुविधायुक्त होतील.त्यासाठी लासूर येथील आमचे युवक मित्र व अडावद येथील सरपंच मॅडम यांचे पती श्री पि आर माळी यांनी तयारी दाखवली.

   तशी तयारी धानोरा, हातेड, चहार्डी, वैजापूर, गोरगावले येथील युवकांनी दाखवल्या स संपूर्ण तालुक्यात किमान १५०बेड ची सोय वाढेल.

   बऱ्याच डॉक्टर किंवा नागरिकांना भीती वाटत आहे की हे शक्य होईल का?. भावांनो आपण देशभर ऑक्सिजन रस्त्यावर लावणारे लोक बघत आहोत.आपल्या कडे सारे काही उपलब्ध आहे.आपल्या कडील रुग्णांची देखील रोज व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे तपासणी चोपडा येथील तज्ञ डॉक्टर्स करतील व सकाळ संध्याकाळ आपणास मार्गदर्शन करतील.तेथे थोडा जरी त्रास वाढला तरी रुग्णांना चोपडा येथे हलवण्यात येईल.त्यामुळे घाबरण्याचे कारण नसेल.अश्या पद्धतीने संपूर्ण नियोजन करण्यात येणार.त्यासाठी तरुणांनी  तयारीला लागा.

   


Post a Comment

0 Comments