महाराष्ट्र दिनानिमित्त शासनाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर
🔆जिल्हा मुख्यालयात एकाच ठिकाणी होणार ध्वजारोहण, कवायती संचालनावर बंदी
बल्लारपूर (राज्य रिपोर्टर) : कोरोना विषाणूची साखळी तोडण्याच्या दृष्टिकोनातून राज्यभरात यावर्षी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन म्हणजेच महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहे महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार विभागाचे वतीने तशा प्रकारच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोरोनाच्या अनुषणगाने दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे तसेच सार्वजनिक ठिकाणी सर्वांसाठी मॉस्क बंधनकारक राहील याची दक्षता घ्यावी राज्यभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे त्यानुसार केवळ जिल्हा मुख्यालयात एकाच ठिकाणी सकाळी 8:00 वा ध्वजारोहण करण्यात यावे तसेच विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी नागपूर, पुणे, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ई ठिकाणी विभागीय आयुक्तांनी ध्वजारोहण समारंभ करिता योग्य ती व्यवस्था करावी तेथील जिल्हाधिकारी यांनी वेगळा कार्यक्रम आयोजित करू नये इतर सर्व जिल्ह्यात केवळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ध्वजारोहण ठिकाणी केवळ पालकमंत्री, विभागीय आयुक्त, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी यांनीच उपस्थित रहावे तसेच ज्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहेत त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याच पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे इतर मान्यवरांना आमंत्रित करू नये तसेच कवायती व संचालनाचे आयोजन करू नये विधिमंडळ उच्च न्यायालय व संविधानिक कार्यालयात केवळ ध्वजारोहण करण्यात यावे ध्वजारोहण करणारे पालकमंत्री काही अपरिहार्य कारणाने कार्यक्रम स्थळी उपस्थित नसल्यास विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्तांनी तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहण करावे अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत.




0 Comments