शोक - संदेश काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत नेता हरपला...विजय वडेट्टीवार काँग्रेस पक्षाने एका सच्चा व अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या नेत्याला गमावले आहे - विजय वडेट्टीवार

 


शोक - संदेश

 काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत नेता हरपला...विजय वडेट्टीवार

 काँग्रेस पक्षाने एका सच्चा व अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या नेत्याला गमावले आहे - विजय वडेट्टीवार

मुंबई/चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) : ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी  मंत्री  व माजी खासदार सन्माननीय एकनाथ गायकवाड  यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एका सच्चा व अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या नेत्याला गमावले आहे,  अशा शब्दात मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दु:ख व्यक्त करुन एकनाथ गायकवाड  यांना श्रद्धांजली वाहिली.

 मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, काँग्रेसचे नेते व माजी खासदार एकनाथ गायकवाड  यांच्या निधनाची वार्ता एकताच अतीव दु:ख झाले.  एकनाथ गायकवाड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते.काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत म्हणून एकनाथ गायकवाड यांची ओळख होती. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती.  काँग्रेसच्या विचारधारेशी आजीवन प्रामाणिक राहणाऱ्या स्व. गायकवाड यांचे  निधन ही महाराष्ट्राची आणि काँग्रेस पक्षाची मोठी हानी आहे. त्यांनी मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. ते दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले होते.  काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष राहिलेल्या एकनाथ गायकवाड यांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविलं होतं. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेससह राजकीय क्षेत्राला खूप मोठा धक्का बसला आहे.

  त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. या महान नेतृत्वाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या कठीण प्रसंगी आम्ही सर्व गायकवाड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments