भ्याड हल्ल्याचा निषेध, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी : रामू तिवारी
काँग्रेसकडून राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध
रामू तिवारी यांच्या नेतृत्वात शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहरात निदर्शने
चंद्रपूर (राज्य रिपोर्टर) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या 'राजगृह' निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य आहे. या घटनेचे पडसाद चंद्रपूर येथेही बघायला मिळाले. शहर काँग्रेस कमिटी कडून पालकमंत्री विजय वड्डेटीवार व खासदार बाळू धानोरकर यांच्या मार्गदर्शनात चंद्रपुर शहर जिल्हा अध्यक्ष रितेश(रामु)तिवारी यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून आरोपीना त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
महामानव डॉ. बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत, आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही, असा विश्वासही चंद्रपुर शहर जिल्हा अध्यक्ष रितेश(रामु)तिवारी यांनी व्यक्त केला.
राजगृह हे डॉ. बाबासाहेबांचे निवासस्थान आहे. बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. आम्हा आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असून गृहमंत्र्यांना विनंती आहे की, सखोल चौकशी होऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, असे मत रामू तिवारी यांनी व्यक्त केला.
आज चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेबांचा पुतळ्याला नमन करून तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी महिला शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल,युसूफभाई हुसैन, एन. एस. यु. आय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, युवक प्रदेश सचिव सचिन कत्याल युवक शहर अध्यक्ष राजेश अड्डर,उपाध्यक्ष नवशाद शेख, अश्विनी ताई खोब्रागडे, अनुसूचित जाती जमात शहर महिला अध्यक्ष अनुताई दहेगावकर, प्रिया चंदेल, परवीन सय्यद,वाणी दारला, एकता गुरले, संजय रत्नपारखी प्रसन्न शिरवार, पिंकी दीक्षित,संजय गंपावार, दुर्गेश कोडाम,रामकृपाल यादव, मोहन डोंगरे, गोपाल अमृतकर,खालिक भाई,पप्पू सिद्दीकी, अनीश राजा, राजू वासेकर, कृणाल रामटेके,रुचित दवे,केतन दुरसेल्वार,अन्नू जंगम,सनी लहामगे,आकाश तिवारी,सलीम भाई शेख,मिनल शर्मा,कासिफ अली, शादाब खान,कृष्णा यादव, रामजीत राजभर, भालचंद्र दानव यांची उपस्थिती होती.
0 Comments