डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड
मुंबई (राज्य रिपोर्टर) : राजगृह हे मुंबई मधील दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. ही पवित्र ऐतिहासिक वास्तू तीन मजली असून आंबेडकरी – बौद्ध व दलित जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १५ ते २० वर्षे ‘राज्यगृह’मध्ये वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचे लाखो अनुयायी डॉ.आंबेडकर जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असतात.
आज संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील सीसीटीव्ही चेही मोठे नुकसान केलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे.
आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे..
0 Comments