४ लाख रूपयांचा हा मुद्देमाल जप्त
ईगल कंपनीच्या सुगंधित तंबाखूचे तब्बल २७५ पाकीट जप्त केले
सिरोंचा (राज्य रिपोर्टर) : मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू आलापल्ली वरुण खरेदी केल्याची माहिती मुक्तिपथ तालुका संघटक सुनीता भगत आणि प्रेरक संतोष चंदावार यांना रात्रीला मिळाली. त्यांनी गुरुवारी सकाळी ही माहिती सिरोंचा पोलिसांना दिली.एका इसमाकडून पोलिसांनी ईगल कंपनीच्या सुगंधित तंबाखूचे तब्बल २७५ पाकीट जप्त केले. ४ लाख रूपयांचा हा मुद्देमाल असल्याचे त्याने सांगितले. मोहम्मद शब्बीर हुसेन शेख असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या इसमाच्या घरी धाड टाकली असता ईगल या सुगंधित तंबाखूचे २७५ पाकीट सापडले. १ हजार रुपये याप्रमाणे ही खरेदी केली असून १५०० रुपयाला आपण त्याची विक्री करीत असल्याची कबुली शब्बीरने दिली. पोलिसांनी हा संपूर्ण माल जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक अजय अहिरकर यांच्या मार्गदर्शनात मेजर विश्वास आणि कुंडगिरी यांनी ही कारवाई केली.चोरट्या मार्गाने पाच पट जास्त दराने सुगंधित तंबाखूची खरेदी व विक्री होत आहे.



0 Comments