विज बिल माफ साठी आप तर्फे आमदार किशोर जोरगेवार ला निवेदन
चंद्रपुर,(राज्य रिपोर्टर) : आम आदमी पार्टी चंद्रपुर महानगर तर्फे संचारबदीच्या काळातील 200 युनिट शासनाने माफ करावे म्हणुन जनतेमध्ये जाऊन स्वाक्षरी अभियान सुरु केले. याच विषयाला घेऊन चंद्रपुरचे आमदार किशोर जोरगेवार यांना विविध मागण्याचे आप तर्फे निवेदन देण्यात आले. संचारबंदीच्या काळात अनेक कुंटूबावर आर्थिक संकट कोसळले आहे. आम आदमी पार्टी ने माहाराष्ट्र शासनाला एक महिण्या पुर्वी निवेदन देऊन प्रती महिणा 200 युनिट विजबिल माफ करण्याची विनती केली होती. आपने हा मूद्दा घेऊन जनते मध्ये जाऊन स्वाक्षरी अभियानाला सुरुवात केली आहे. शहरातील मीत्रनगर, विठ्ठल मंदीर वार्ड, वडगाव, दादमहल वार्ड, बंगाली कॅम्प, बाबुपेठ सह ईतर वार्डात चांगला प्रतीसाद मीळत आहे. आज दि. 24 जुनला चंद्रपुरचे आमदार किशोर जोरगेवार यांना शासनाने सरसकट प्रती महीणा 200 युनिट विज बिल माफ करावे, 1 एप्रिल पासुन सुरु झालेले निविन विजदर रद्द करण्यात यावे, सद्या तरी कोणाचीही विज कापु नये, अशा विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना आपचे चंद्रपुर जिला संघटनमत्री परमजित सिंग झगडे , सचिव संतोष दोरखंडे, सुनिल भोयर, योगेश आपटे, सिंकदर सागोरे, दिलीप तेलंग, प्रशात येरणे, संदिप पिंपळकर अजय डुकरे, राजेश चेडगुल्लवार, देवकीताई देशकर, पुजा चौधरी, ममता मासीरकर, गंगा चौधरी, सुनिल वाजपेय,आदींचा सहभाग होता.



0 Comments