उपविभागीय अधिकारी यांच्या पत्र व आश्वासनामुळे छोटूभाई यांचे तात्पुरते आंदोलन मागे



उपविभागीय अधिकारी यांच्या पत्र  व आश्वासनामुळे  छोटूभाई यांचे तात्पुरते आंदोलन मागे



वरोरा,(राज्य रिपोर्टर) : वरोरा शहरातून जाणारे ऐकोना कोळसा खाणीचे जड वाहन बंद होणार छोटूभाई यांच्या निवेदन व आंदोलनाची दखल. मागील काही महिन्यांपासून ऐकोना कोळसा खाणीचे जड वाहन वरोरा शहरातून जात असल्याने अनेक नवीन रस्त्याला खड्डे पडून रस्त्याचे नुकसान अपघातात वाढ व कोळशाचे प्रदूषण वाढ होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता.

 या समस्येचे निवारण होण्याकरीता सार्वजनिक बांधकाम सभापती वरोरा तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस असंघटित कामगार छोटूभाई यांनी नगरपालिकेत सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून व तसेच जिल्हा ग्राहक नागरी संरक्षण समिती ठराव मंजूर करून व तसेच याची दखल घेत दिनांक 26 /02 /2020 पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पार पडलेल्या बैठकीत मुख्याधिकारी श्री. बल्लाळ, ठाणेदार श्री. पाटील ,कोळसा.खाणीचे अधिकारी सदर बैठकीत उपस्थित होते सदर बैठकीत शहरातून जाणारे जड वाहन बंद करण्या करिता छोटूभाई यांनी प्रशासनाला सविस्तर माहिती व अडचणी सांगितल्या. त्यावरून सदर प्रस्ताव पोलीस उपविभागीय अधिकारी पांडे  यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सर यांच्याकडे पाठवला आणि काही दिवस यामुळे हे त्याचे जड.वाहन वरोरा शहरातून बंद. ठेवून.        . वनोजा गावावरून एमआयडीसी रोड ने.कंपनीकडे जात होते परंतु मागील काही दिवसापासून     लाॅकडाऊन चा फायदा घेत रात्रदिवस वरोरा शहरातून जड वाहन.सुरू केल्यामुळे त्वरित बंद करा अन्यथा सर्व वाहनांना थांबून रस्ता रोको आंदोलन नागरिकांना सोबत घेऊन करणार असे.    लेखी पत्र छोटूभाई यांनी उपविभागीय अधिकारी श्री. शिंदे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. पांडे ,ठाणेदार श्री. पाटील .यांना दिले त्याची दखल घेऊन आज दिनांक 24 जून ला उपविभागीय अधिकारी यांनी छोटू भाई यांना कोळशाचे जड वाहन बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली असून सदर आंदोलन मागे घ्यावा  मा. जिल्हाधिकारी.... यांच्या सूचनेवरून सदर वाहने वरोरा शहरातून बंद करण्याकरीता आदेश करण्यात येत आहे असे आश्वासन उपविभागीय अधिकारी यांनी दिले. सदर कार्यवाही मा.पालक मंत्री वडेट्टीवार, मा. खासदार धानोरकर साहेब मा. आमदार धानोरकर मॅडम यांच्या सहकार्यामुळे होत आहे.

Post a Comment

0 Comments