बल्लारपुरत लावण्यात आलेल्या वॉटर एटीएमच्या कामाच्या चौकशीची करावी - सचिन जाधव
वॉटर एटीएम च्या अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले
निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामाची सर्वस्वी जबाबदारी ही नगरपालिकेच्या संबंधित विभागाची असेल
बल्लारपुर (राज्य रिपोर्टर)दिपक भगत : बल्लारपुर शहरात अनेक ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होण्याच्या दृष्टिने नगर परिषदेच्या हददीत एकूण 6 वॉटर एटीएम लावण्यात आले.
असून सदर वॉटर एटीएम लावण्याचे काम N S Association Chandrapur यांनी केले असून सदर वॉटर एटीएम च्या कामाची पाहणी केली असता असे निदर्शनास येते की, सदर काम है अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे तसेच करण्यात आलेले सदर काम हे अंदाजपत्रकानुसार झालेले नाही तरी सदर कामाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी तसेच बल्लारपुर शहरात 15 ठिकाणी नवीन वॉटर एटीएम लावण्याचे काम सुरु आहे सदर काम सुध्दा N S Association च्या मार्फ़त होत आहे.
सदर काम सुध्दा निकृष्ट दर्जाचे होवू शकते तरी जुन्या कामाची चौकशी पूर्ण होईपर्यंत करण्यात येणारे नवीन काम थांबविन्यात यावे अन्यथा सदर निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामाची सर्वस्वी जबाबदारी ही नगरपालिकेच्या संबंधित विभागाची असेल याकरिता बल्लारपुर शहरात लावण्यात येणाऱ्या वॉटर एटीएम ची निष्पक्ष स्वरुपात चौकशी करण्याची मागणी बल्लारपुर नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेता, अध्यक्ष युवक काँग्रेस बल्लारपूर विधानसभा क्षेत्र व नगरसेवक श्री. सचिन जाधव यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.






0 Comments