बल्लारपुर पोलिसांनी मुद्देमालासह 6,50,000 रु ची दारू पकडली : एकूण 2 आरोपी 1 फरार


बल्लारपुर पोलिसांनी मुद्देमालासह 6,50,000 रु ची दारू पकडली : एकूण 2 आरोपी 1 फरार                                        बल्लारपुर (राज्य रिपोर्टर) : बल्लारपुर शहरात अवैध दारू विक्री व दारुची वाहतूक सुरु असल्याची माहिती गुप्त सूत्राच्या आधारे मिळाल्या नंतर पोलिस स्टेशन बल्लारपुर अंतर्गत डी.बी.पथकाचे मार्फ़त बल्लारपुर शहरातील फुलसिंग नाईक वार्ड परिसरात प्रोव्ही. रेड करण्यात आली असून या धाड़ी दरम्यान 10 खर्ड्याचे बॉक्समध्ये देशी दारू रॉकेट संत्रा च्या 1000 बॉटल मिळून आल्या यांची अंदाजीत किमत 1,50,000 रु तर 5,00,000 रु ची शेवरलेट कंपनीची चारचाकी कार असा एकूण 6,50,000 रु चा दारू साठा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी 2 आरोपींची ओळख करण्यात आली असून नामे बिरसिंग भोंड (फरार), सागरसिंग भोंड रा. फुलसिंग नाईक वार्ड बल्लारपुर असून सदर प्रकरणी जप्त करण्यात आलेला माल व आरोपी यांना पोलिस स्टेशन ला आणून अपराध क्र 418/2020 मदका 65(अ) 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या संबंधिचा पुढील तपास सुरु आहे सदर कारवाई मा.एस.एस.भगत पोलिस निरीक्षक भगत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास गायकवाड़ यांच्या नेतृत्वात डी.बी पथकाच्या माध्यमातुन करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments