म्हाडा कॉलनीत रात्री चाकुने केली हत्या, 12 तासाच्या आत अटक करण्यात आले


म्हाडा  कॉलनीत रात्री  चाकुने केली हत्या
म्हाडा काॅलनी येथील खून प्रकरणी दोन आरोपींना अटक
12 तासाच्या आत अटक करण्यात आले 

चंद्रपूर, (राज्य रिपोर्टर) :  शहरा जवळच्या म्हाडा कॉलोनी मध्ये 10 जूनच्या रात्री 10.30 ते 11 वाजताच्या सुमारास कॉलोनी मधील काही युवकांनी चाकूने हल्ला चढवीत निलेश गोटे या युवकाची त्याची हत्या केली. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी बारा तासाच्या आत अटक केली
निलेशवर चाकूने हल्ला होत असताना वडील यांनी हल्ला करणाऱ्या युवकाचा चेहरा बघितला. मृतक निलेशने श्वास सोडण्याआधी वडीलाला हल्ला करणाऱ्या युवकाचे नाव सांगितले. देहेकर यांनी व त्याच्या मित्रांनी हल्ला केला, असे बयान निलेश ने दिले. हल्ला करणारे 3 ते 4 युवक असल्याची माहिती मृतक निलेशच्या वडीलाने दिली. नेमका वाद कशामुळे झाला याचे कारण अस्पष्ट आहे. निलेशच्या अंगावर चाकूचे घाव होते, गळ्याला चाकूचा घाव सुद्धा होता. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व तपास केला. 
पोस्टे रामनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. ५१६/२०२०२ कलम ३०२,३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणातील मुख्य आरोपी अंकित बंडु देहारकर व शुभम सुधाकर देहारकर  (रा. दाताळा नविन वस्ती चंद्रपुर) यांना 12 तासाच्या आत अटक करण्यात आली. 
उपविभागीय अधिकारी शीलवंत नांदेडकर . रामनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोउपनि संदिप कापडे, सफौ माहुलीकर, पोहवा परचाके , पोहवा काबळी , पोहवा पुठावार, नापोशि चिकाटे, नापोशि येरमे, पोशि जुमनाके, मपोशि भावना आणि गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments