खासदारांनी केला कोरोना योध्याच्या सन्मान
चंद्रपूर (राज्य रिपोर्टर): सध्या सर्वच देश कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने हैराण आहे. मोठ्या प्रमाणात प्रसार या विषाणूचा होत असल्याचे दिसून येते. कोरोना लढ्यात महत्वाची भूमिका डॉक्टर पार पाडीत आहेत. मोठ्या प्रमाणात ते रुग्णाची सेवा करीत रुग्णांना बरे करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस माजी अध्यक्ष व खासदार राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टरांचा खासदार बाळू धानोरकर यांनी सन्मान केला आहे. त्यांना भेटवस्तू व पी पी इ किट्स देण्यात आली.
चंद्रपूर येथील डॉ. विश्वास झाडे, डॉ. मानवटकर, डॉ. नगराळे, डॉ नागरेचा या डॉक्टररांच्या खासदार बाळू धानोरकर यांनी सन्मान केला आहे. यावेळी कॉग्रेसचे शहर अध्यक्ष नंदू नागरकर, कॉग्रेसचे गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, कॉग्रेस नेते विनोद दत्तात्रेय, सुभाष गौर, अश्विनी खोब्रागडे, सागर खोब्रागडे यांची उपस्थिती होती.
अशाच प्रकारे प्रत्येकानी आपले योगदान समाजातील प्रत्येक घटकाकरिता दिल्यास मोठ्यातील मोठ्या संकटावर आपण मात करू शकतो. सर्वानी एक होऊन प्रत्येक संकटावर मत करायला पाहिजे. असे मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले.



0 Comments