कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष व संघटनेच्या वतीने विज बिल संदर्भात निवेदन : अनेक संघटना आन्दोलनाच्या पावित्र्यात
बल्लारपुर (राज्य रिपोर्टर) : चीनच्या वुहान प्रांत येथून सुरु झालेल्या व संपूर्ण जगभरात धूमाकूळ घालत असलेल्या कोरोना या विषाणुजन्य आजारामुळे संपूर्ण देश लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे सद्यस्थितित भारत देशाचा विचार केला तर महाराष्ट्र हे कोरोनाच्या बाबतीत अग्र क्रमांक वर आहे याशिवाय मार्च महिन्यापासुन कोरोनामुळे अनेकांचे रोजगार हिरावले असताना अनेकांना जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी झगड़ावे लागत असतांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे मात्र यास भरीस भर की काय महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी ने मार्च ते जून या 3 महिन्याचे विज बिल(सरासरी) स्वरुपात देण्यात आले आहे यामुळे अनेक विज ग्राहकाना या काळात 5 ते 7 हजार रु पर्यन्त विज बिल आले आहे यामुळे संपूर्ण राज्यभरात विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना या संदर्भात शासनाला निवेदन देत आहे तसेच अनेक संघटना आन्दोलनाच्या पावित्र्यात आहे बल्लारपुर शहराचा विचार केला तर नुकतेच काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या वतीने वाढून आलेल्या विज बिल संदर्भात लॉकडाउन काळातील विज बिल माफ करण्यासंदर्भात मा.जिल्हाधिकारी यांना ही निवेदन देण्यात आले तसेच बल्लारपुर शहर विकास आघाडी च्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 3 महिन्याचे विज बिल माफ करण्यात यावे तसेच कोरोनामुळे आर्थिक परिस्थितिशी लढा देत असतांना जीवन जगने कठिन होत असताना दुसरीकडे विज वितरण कंपनीने 3 महिन्यात पाठविलेल्या विज बिलाने कम्बरडे मोडले आहे यांची दखल घेवून बल्लारपुर शहर विकास आघाडीने बल्लारपुर तहसीलदार मार्फ़त राज्याच्या ऊर्जामंत्री डॉ.नितिन राउत यांना निवेदन पाठवून य्या काळातील विज बिल माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा बल्लारपुर शहर विकास अघाडीच्या वतीने आंदोलन करण्याची भूमिका मांडली आहे यावेळी निवेदन देताना भारत थुलकर, अरुण लोखंडे, संजय डुम्बेरे, मुन्ना दिगवा, सरफराज शेख, वामन कांबळे, वासुदेव कांबळे, ताईबाई फुलझेले, वनमाला भसारकर, रेखा मेश्राम, शालिनी वावरे ई ची उपस्थिति होती तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 3 महिन्याचे विज बिल माफ करावे तसेच या काळात लॉकडाउन काळातील वारेमाप स्वरुपात विज बिल पाठवीणाऱ्या शासनाच्या धोरना विरोधात उलगुलान संघटनेच्या वतीने बुधवार दिनांक २४ जून २०२० ला बल्लारपुर शहरातील जूने तहसील कार्यालय समोरिल परिसरात मा.राजुभाऊ झोड़े यांच्या नेतृत्वात मुंडन आंदोलन करण्यात येत आहे यात सामील होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.



0 Comments